रत्नागिरी : शिवसेनेनंतर्गत निर्माण झालेल्या बंडाळीने महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरु असताना आता याच राजकारणात मनसेने उडी घेतली आहे. कोकणची भूमी ही निष्ठावान लोकांची आहे. गद्दारांना ठोका, ठाकरे ब्रँड वाचवा', अशा आशयाचे पोस्टर रत्नागिरीत लावण्यात आले आहे.
मनसेकडून कोकणात एक पोस्टर लावण्यात आलं आहे. त्यात म्हटले आहे की, कोकणाची भूमी निष्ठावान लोकांची आहे. या भूमीवर ज्या लोकांनी गद्दारी केली आहे त्यांना झोडून काढा. हे पोस्टर खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी लावले आहे. मात्र अजूनही मनसेच्या मुख्य कार्यालयाकडून कुठलीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मनसेप्रमुख राज ठाकरेंना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते मनसेची ही भूमिका म्हणजे शिवसेनेला ताकद देणारी असली तरी सध्याच्या परिस्थितीतून बाहेर काढू शकत नाही.
व्हायरल व्हिडीओ : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे काही असंच सांगत आहेत.
-
@mieknathshinde
— Purnendra Singh Malik (@Purnendramalik) June 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
You said That You Belive on Balasaheb Ideology
Then slap on your face and also all others who joined you गद्दार pic.twitter.com/yGFHjLVDYH
">@mieknathshinde
— Purnendra Singh Malik (@Purnendramalik) June 22, 2022
You said That You Belive on Balasaheb Ideology
Then slap on your face and also all others who joined you गद्दार pic.twitter.com/yGFHjLVDYH@mieknathshinde
— Purnendra Singh Malik (@Purnendramalik) June 22, 2022
You said That You Belive on Balasaheb Ideology
Then slap on your face and also all others who joined you गद्दार pic.twitter.com/yGFHjLVDYH
संजय राऊत यांची धमकी : आज सकाळीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकीवजा इशारा दिला होता. राऊत म्हणाले की, पैसे देऊन कुणी पक्ष खरेदी करू शकत नाही. हा बाळासाहेबांची शिवसेना आहे. हजारो लाख शिवसैनिकांच्या बलिदानातून शिवसेना उभी आहे. पक्ष एकसंघ व मजबूत आहे. बंडखोर आमदार हे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नाही. त्यांच्या कुटुंबांची सुरक्षेची जबाबदारी नसते. बकरीसारखे बें, बें करू नका, असा टोला त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना लगावला. देवेंद्र फडणवीसांनी या भानगडीत पडू नये, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असा टोला, त्यांनी लगावला.
मनसेच्या बॅनरची खेडमध्ये चर्चा : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे अशी लढाई सुरू झाली आहे. मात्र असं असताना भाजपकडूनही सावध भूमिका घेतली जात आहे. तर इतर पक्षही सावध पावलं टाकत आहेत. एकीकडे असं असताना रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लावण्यात आलेल्या एका बॅनरची चांगलीच चर्चा आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणे नाका परिसरात हा बॅनर लावण्यात आला आहे. यावरील मजकूर लक्षवेधी ठरत आहे. 'कोकणची भूमी निष्ठावंतांची, गद्दारांना ठोका, ठाकरे ब्रँड वाचवा' अशा आशयाचे बॅनर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लावण्यात आले आहेत. त्यावर एका बाजूला भगवी शाल परिधान केलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो आहे तर दुसर्या बाजूला मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा फोटो आहे. त्यामुळे या बॅनरवरून खेडमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.