रत्नागिरी - 'भारतीय जनता पक्षाचे कार्यालय माहीममध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांना वाटते की, भाजपाचे कार्यकर्ते शिवसेना भवन फोडतेत की काय, जर वेळ आली, तर तेही करू' असे वक्तव्य यावेळी प्रसाद लाड यांनी केले होते. यावर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. शिवसेनेचे आमदार आमदार राजन साळवी यांनी देखील आमदार प्रसाद लाड चांगलाच समाचार घेतला आहे.
पुन्हा निवडणुकीला समोर जा -
'हिम्मत असेल तर पुन्हा निवडणुकीला समोर जा मग बघ शिवसैनिक तुझं कसं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील' असा समाचार घेत आमदार राजन साळवी यांचा प्रसाद लाड यांना इशारा दिला आहे.
'शिवसेनेच्या मतांवरच तू आमदार' -
'शिवसेनेचे आणि शिवसेनाप्रमुखांचे या प्रसाद लाडवर प्रचंड उपकार आहेत, आधी आमदारकीचा राजीनामा दे कारण शिवसेनेच्या मतांवरच तू आमदार झाला आहेस, जर हिम्मत असेल तर पुन्हा निवडणुकीला समोर जा मग बघ शिवसैनिक तुझं कसं थोबाड फोडतील आणि तुला गाडतील' अशा शब्दात राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी प्रसाद लाड यांचा समाचार घेतला आहे.