ETV Bharat / state

अखेर 'त्या' बेपत्ता शाळकरी मुलाची हत्या; कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह - बेपत्ता निखिल कांबळेची हत्या

मिरजोळे पाडावेवाडी येथील 13 वर्षीय निखिल कांबळे या सातवीत शिकणाऱ्या मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. निखिलचा मृतदेह शनिवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत सापडला. निखिलची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली असून मृतदेह एका चरात दगड टाकून लपवला होता.

ratnagiri
मिरजोळे पाडावेवाडीतील बेपत्ता निखिल कांबळेची हत्या; कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
author img

By

Published : Feb 23, 2020, 7:46 AM IST

Updated : Feb 23, 2020, 8:36 AM IST

रत्नागिरी - मिरजोळे पाडावेवाडी येथील 13 वर्षीय निखिल कांबळे या सातवीत शिकणाऱ्या मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. निखिलचा मृतदेह शनिवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत सापडला. निखिलची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली असून मृतदेह एका चरात दगड टाकून लपवला होता. परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अंगातील कपड्यांवरून निखिलची ओळख पटली.

मिरजोळे पाडावेवाडीतील बेपत्ता निखिल कांबळेची हत्या; कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

11 फेब्रुवारीपासून निखिल बेपत्ता होता. त्यानंतर 12 फेब्रुवारीला शहर पोलीस ठाण्यात निखिल हरवल्याची तक्रार देण्यात आली होती. निखिलचा शोध घेण्यासाठी रेल्वेस्टेशन परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासण्यात आले. पण निखिलचा शोध लागत नव्हता. शनिवारी सकाळी मिरजोळे घवाळवाडी सडा येथे प्रभाकर करंदीकर यांच्या सामाईक जागेच्या शेजारी असलेल्या बागेत एक कामगार वानरांना हाकलण्यासाठी सड्यावर गेला होता. त्याला झुडपाजवळून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. वास तिव्र असल्याने त्याने जवळ जावून पाहिल्यानंतर मोठ्या दगडांखाली सडलेल्या अवस्थेतील मृतदेह असल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर या घटनेची माहिती त्याने मालकांना दिली.

हेही वाचा - रत्नागिरीत मोबाईल विक्रेत्यावर बेछूट गोळीबार; कारण अस्पष्ट

करंदीकर यांनी शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक अनिल लाड, पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, पोलीस निरीक्षक अनिल विभूते, पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. दगडाखाली असलेला मृतदेह पूर्णत कुजलेला होता. डोक्याची कवटी, अंगावरील ड्रेस, चप्पल यावरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - नाराजी नाट्य..! भास्कर जाधवांनी व्यासपीठावरच झटकला राऊतांचा हात

दरम्यान, बारा दिवसांपुर्वी बेपत्ता असलेल्या निखिलच्या नातेवाईकांना बोलावून खात्री केल्यानंतर हा मृतदेह निखिलचा असल्याचे आई वडीलांनी सांगितले. मृतदेहापासून दोनशे ते अडीचशे मिटरवर एका बांधाच्या आतमध्ये निखिलचे दप्तर आढळून आल्याने तो मृतदेह निखिलचा असल्याचे निश्चित झाले. निखिलची हत्या करण्यामागे नेमके कारण काय? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

Last Updated : Feb 23, 2020, 8:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.