ETV Bharat / state

मासेमारीला गेलेले 6 खलाशी नौकेसह बेपत्ता; समुद्रात युद्धपातळीवर शोधमोहिम सुरू - जयगड पोलीस ठाणे

नौका बेपत्ता झाल्याने जयगड आणि साखरीआगर परिसरातील वातावरण अतिशय धीरगंभीर आहे. बेपत्तांच्या शोध घेण्यासाठी काही स्थानिक मच्छीमार देखील बाहेर पडले आहेत. आजचा पाचवा दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. कोणालाही कोणतीही माहिती उपलब्ध न झाल्याने चिंता वाढली आहे.

नौका
नौका
author img

By

Published : Oct 31, 2021, 6:41 AM IST

रत्नागिरी - रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मासेमारीसाठी गेलेली नविद-२ ही नौका आणि त्यावरील तांडेलसह सहा खलाशी बेपत्ता झाले आहेत. गेले पाच दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क न झाल्याने मालकाने जयगड पोलिस ठाण्यात, तशी तक्रार दाखल केली आहे. स्थानिक मच्छीमारांनी शोध मोहीम सुरू केली असून, कोणाला काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांचे आवाहन -

दरम्यान खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी, कोस्टगार्डची एक स्पीड बोट व काही खाजगी बोटी यांच्याकडून युद्धपातळीवर 'सर्च ऑपरेशन' हाती घेण्यात आले आहे. जयगड येथील नासीर हुसैन मिया संसारे यांच्या मालकीची ही मासेमारी नौका आहे. "नविद २" असे तिचे नाव असून २६ ऑक्टोबरला ही नौका मासेमारीसाठी जयगडहुन निघाली. बहुदा दोन ते तीन दिवसांमध्ये मासेमारी करून नौका परत येते. परंतु यावेळी ती परत आलीच नाही किंवा तांडेल, अन्य खालाशांचा संपर्कच झाला नाही. संसारे यांनी संपर्क करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. तसेच सोशल मीडियावर त्याची माहिती आणि फोटो देखील व्हायरल केले. मात्र अजून काही संपर्क झालेला नाही. या बोटीवर तांडेल दगडु, गोविंद, दत्ता, अमोल, सूर्या, अनिल यांची पूर्ण नावे मिळालेली नाही. सर्व राहणारे साखरीआगर येथील आहेत. ते अजून परत आलेले नाहीत. तरी सदर बोटी बद्दल किंवा व्यक्तींबद्दल काही माहिती मिळाल्यास जयगड पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.