ETV Bharat / state

शासकीय मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही - मंत्री आदित्य ठाकरे - Aditya Thackeray inspects damage

जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. शासकीय मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण येथे सांगितले.

Aditya Thackeray Chiplun visit
शासकीय मदत चिपळूण
author img

By

Published : Jul 29, 2021, 8:06 PM IST

रत्नागिरी - जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाला शासकीय मदत तातडीने देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. शासकीय मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण येथे सांगितले.

माहिती देताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

हेही वाचा - 'पूरग्रस्त भागातील संपर्क यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा'

पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता आदित्य ठाकरे चिपळूण दौऱ्यावर आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पूरबाधित नागरिकांना मदत देण्यात आली.

नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्वाचे

मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे. शासनाकडूनही सर्वतोपरी आवश्यक ती मदत केली जाईल. लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआएफ, नेव्ही, आर्मी, सामाजिक संस्था यांनी पूर परिस्थितीमध्ये रेस्क्यूचे चांगले काम केले आहे. पंचनामे पूर्ण करण्याचे काम सुरू झाले आहे. पंचनामे पूर्ण होताच ज्याप्रमाणे नुकसान झाले आहे, त्याप्रमाणे सर्व पूरबाधित नागरिकांना शासनाकडून मदत निश्चित केली जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

शालेय विद्यार्थ्यांची आपुलकीने विचारपूस

दौऱ्यादरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण शहरात नागरिकांशी संवाद साधला. तसेच शालेय मुलांशीही संवाद साधून त्यांची आपुलकीने विचारपूस केली. आपल्या या भेटीदरम्यान त्यांनी बाजारपेठेत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, पूरपरिस्थितीमुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवू नये म्हणून आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आली आहे. शहरातील चिखल, कचरा स्वच्छ करण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई महानगरपालिकांकडून मशीन पुरविण्यात आली असून त्यांनी स्वच्छतेचे काम सुरू करण्यात आले आहे. दरडग्रस्त भागात सक्शन मशीन पोहचवण्यात काही अडथळे निर्माण होत आहेत, तरीही त्यातून मार्ग काढून नागरिकांना मदत पोहचविली जाईल.

हेही वाचा - रत्नागिरी जिल्हा बँक पूरग्रस्त व्यापाऱ्यांना 5 टक्के दराने कर्ज देणार - मंत्री उदय सामंत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.