ETV Bharat / state

रत्नागिरीहून दोन विशेष रेल्वेने दीड हजार परप्रांतीय मजूर उत्तर प्रदेशकडे रवाना - shramik railway ratnagiri news

मजुरांसाठी बुधवारी संध्याकाळी दोन रेल्वे सोडण्यात आल्या. रत्नागिरीतून सोडण्यात आलेली रेल्वे बस्ती-उत्तर प्रदेश येथे रवाना झाली. या रेल्वेमधून 1 हजार 208 श्रमिक रवाना झाले. तर, दुसरी रेल्वे चिपळूणमधून गोरखपूर-उत्तरप्रदेश येथे रवाना झाली. चिपळूण रेल्वे स्थानकातून सुटलेल्या या श्रमिक रेल्वेमधून जवळपास 1 हजार 400 कामगार उत्तर प्रदेशला रवाना झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातून दोन विशेष ट्रेनने मजूर उत्तरप्रदेशकडे रवाना

author img

By

Published : May 28, 2020, 4:12 PM IST

रत्नागिरी - कोकण रेल्वेच्या माध्यमातून रत्नगिरी जिल्ह्यात अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात पाठवले जात आहे. बुधवारी संध्याकाळी आणखी काही कामगार रत्नागिरी आणि चिपळूण रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वेने आपल्या राज्यात रवाना झाले. यासाठी रत्नागिरी आणि चिपळूणवरून वेगवेगळ्या ट्रेन सोडण्यात आल्या.

सध्या राज्यातील हजारो कामगार श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून आपआपल्या राज्यात परतत आहेत. कोकणातूनही यापूर्वी काही विशेष रेल्वे कोकण रेल्वेच्या माध्यमातून सोडण्यात आल्या होत्या. सिंधुदुर्गतून तसेच रत्नागिरीतून या ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा बुधवारी संध्याकाळी दोन रेल्वे श्रमिकांसाठी सोडण्यात आल्या. रत्नागिरीतून सोडण्यात आलेली रेल्वे बस्ती-उत्तर प्रदेश येथे रवाना झाली. या रेल्वेमधून 1 हजार 208 श्रमिक रवाना झाले. तर, दुसरी रेल्वे चिपळूणमधून गोरखपूर-उत्तर प्रदेश येथे रवाना झाली. चिपळूण रेल्वे स्थानकातून सुटलेल्या या श्रमिक रेल्वेमधून जवळपास 1 हजार 400 कामगार उत्तर प्रदेशला रवाना झाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.