ETV Bharat / state

Matheran Hill Station Ganpati Statue : माथेरानच्या डोंगरात गणपती मूर्ती उभारणाऱ्या शिल्पकाराचे निधन - Ganpati Statue Sculptor Death

माथेरानच्या डोंगरात एका दगडावर स्थानिक कलाकारांनी आपल्या कलाकुसरीने निर्माण केलेला निसर्गराजा गणपती आकर्षणीचे ठिकाण आहे. डोंगराच्या कपारीत आणि खोल दरीच्या बाजुला ३५ फुट उंचीचा गणपती प्रामुख्याने ट्रेकर्सला आपल्याकडे खुणावतो. २००५ पासुन त्या ठिकाणी गणपती उभारण्याचे काम केले जात असुन त्यात अनेक बदल करून भव्य दिव्य निसर्गराजा गणपती उभारण्याचे काम पुर्ण झाले आहे.

Matheran Hill Station Ganpati Statue sculptor Death
डोंगरात गणपती मूर्ती उभारणाऱ्या शिल्पकाराचे निधन
author img

By

Published : Mar 24, 2022, 5:39 PM IST

रायगड : माथेरानच्या डोंगरात पर्यटन स्थळ निर्माण करणारे रेल्वेचे निवृत्त मोटरमन राजाराम खडे यांचे 23 मार्च 2022 रोजी निधन ( Ganpati Statue Sculptor Death ) झाले आहे. अनेक महिने आजारपणाने अंथरुणाला खिळलेले खडे यांची ओळख कड्यावरच्या गणपतीमुळे निर्माण झाली होती.

Matheran Hill Station Ganpati Statue
राजाराम खडे यांचे निधन

भव्य दिव्य गणपती मूर्ती उभारली - माथेरानच्या डोंगरात एका दगडावर स्थानिक कलाकारांनी आपल्या कलाकुसरीने निर्माण केलेला निसर्गराजा गणपती आकर्षणीचे ठिकाण आहे. डोंगराच्या कपारीत आणि खोल दरीच्या बाजुला ३५ फुट उंचीचा गणपती प्रामुख्याने ट्रेकर्सला आपल्याकडे खुणावतो. २००५ पासुन त्या ठिकाणी गणपती उभारण्याचे काम केले जात असुन त्यात अनेक बदल करून भव्य दिव्य निसर्गराजा गणपती उभारण्याचे काम पुर्ण झाले आहे.

नेरळ - माथेरान मिनी ट्रेनच्या इंजिनाचे सारथ्य म्हणुन अनेक वर्षे धुरा वाहणारे नेरळ येथील राजाराम खडे यांना माथेरानवरून नेरळकडे येतांना एक कडा नेहमी खुणावत होती. साधारण ४७ ते ५० फुट उंचीच्या या कड्याला असलेला आकार यामुळे मिनीट्रेन घेऊन जाताना आणि येताना प्रवासात त्यांचे हात आपोआप जोडले जात असते. त्यांनी २००५ मध्ये माथेरानच्या डोंगरात ज्यावेळी प्रचंड भुस्खलन झाले, यावेळी मिनीट्रेन बंद पडली होती. त्यामुळे सतत आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या त्या दगडाच्या कड्यावर राजाराम खडे पोहचले. तेथे काळ्या पाषाणातील त्या दगडाला लोखंडी पत्र्याच्या साहाय्याने गणपतीच्या तोंडाचा आकार देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी खडी आणि सिमेंट यांच्या साहाय्याने हात तयार केले. त्या चार हातात गणपती बाप्पाची चार आयुधे देण्यात आली. त्यामुळे बाप्पाचा आकार आल्याचे लक्षात येताच राजाराम खडे यांनी आपले सहकारी सोपान खाडे, विश्वनाथ भोसले आणि राजीव शिंदे यांच्या मदतीने गवंडी काम करून निसर्ग राजा गणपती म्हणजे कड्यावरचा गणपती घडवीला.

तर ४७ मीटरच्या दगडी कड्याला गणेशाच्या भक्तीमुळे आकार देण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर राजाराम खडे यांनी पुढे गणेशापुढे मोदक असावा म्हणून, तब्बल साडेपाच फुट उंचीचा आणि एका व्यक्तीच्या कवेत येणार नाही. एवढा मोठा मोदक सिंमेंटच्या साहाय्याने तयार करण्यात केला. एखाद्या व्यक्तीच्या उंचीपेक्षा मोठ्या आकाराचा उंदीरमामा असावा ही गोष्ट निसर्गराजा गणपती येथे शक्य झाली आहे. या कड्यावरच्या गणपतीपासुन काही अंतरावर असलेल्या पेब म्हणजे विकटगडावर असंख्य ट्रेकर्स येत असतात. किल्ल्यावर येणारे सर्व ट्रेकर्ससाठी मोठ्या संख्येने कड्यावरच्या गणपतीला भेट देत असतात. दुसरीकडे हौशी पर्यटक आणि ट्रेकर्स हे आवर्जुन निसर्गराजा गणेशाची भेट घेण्यासाठी येत असतात. त्या ठिकाणी पोहचण्यासाठी किमान चार किलोमीटरचे अंतर नेरळ- माथेरान मिनीट्रेच्या मार्गात चालत जावे लागते. त्यामुळे देखील ट्रेकिंगचा आनंद घेता येतो, पुढे काही अंतर डोंगर उतरून आणि पुन्हा डोंगर चढून कड्यावरचा गणपतीला जाता येते.

हेही वाचा - महाराष्ट्रातील रसवंती गृहांचे नाव नवनाथ आणि कानिफनाथच का? जाणून घ्या शेकडो वर्षाच्या परंपरेचा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.