ETV Bharat / state

रत्नागिरीत म्हाडाच्या राज्यस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय - म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत

म्हाडा प्राधिकरणाची राज्यस्तरीय बैठक रत्नागिरी येथे पार पडली आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

रत्नागिरीत म्हाडाच्या राज्यस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय
author img

By

Published : Aug 26, 2019, 8:51 PM IST

रत्नागिरी - म्हाडा प्राधिकरणाची राज्यस्तरीय बैठक रत्नागिरी येथे पार पडली आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कलाकारांसह म्हाडा कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना म्हाडातर्फे घरे उपलब्ध होणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरीत म्हाडाच्या राज्यस्तरीय बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी, बैठकीत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. तसेच 155 कोटींची तरतूद करून रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वसाहतीचा प्रश्न निकाली लागल्याचेही त्यांनी सांगितले.

आचारसंहितेपूर्वी गिरणी कामगारांच्या घरांच्या संदर्भात लॉटरी निघणार असल्याचा महत्त्वाचा खुलासा सामंत यांनी यावेळी केला आहे. हायकोर्टाने नेमलेल्या कमिटीसमोर 28 ते 30 ऑगस्ट रोजी यासंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यात म्हाडा आपली बाजू मांडणार असल्याचेही सामंत म्हणाले. लवकरच सोडती बाबत निर्णय होईल असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर, रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे 300 घरं, चिपळूण येथे 400 घरं व एक नाट्यगृह आणि रत्नागिरीत दोन नवीन प्रोजेक्ट लवकरच सुरू करणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 160 घरांची स्किम प्रस्तावित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Intro:रत्नागिरीत म्हाडाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

रत्नागिरी पोलीस वसाहतीसाठी 155 कोटींची तरतूद करून शिफारस

दापोली येथें 300 घरं, चिपळूण येथे 400 घरं बांधणार

कलाकार, पत्रकार, म्हाडा कर्मचारी, शासकीय कर्मचार्यांसाठी घरं उपलब्ध करून दिली जाणार

रत्नागिरी, प्रतिनिधी

कलाकारांसह म्हाडा कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना लवकरच म्हाडाची लॉटरी लागणार आहे. रत्नागिरी येथे झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय झाला असून रत्नागिरी पोलिसांच्या घराचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. रत्नागिरी पोलीस वसाहतीसाठी 155 कोटींची तरतूद करून त्याची शिफारस शासनाकडे केली असल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या बैठकीला म्हाडा उपाध्यक्ष मिलींद म्हैसकर,अप्पर मुख्य सचिव गृहनिर्माण विभाग संजय कुमार,नगरविकास विभाग प्रधान सचिव नितिन करीर,मुबंई म्हाडा सभापती मधु चव्हाण,मुबंई इमारत दुरुस्ती मंडळ सभापती विनोद घोसाळकर,कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील,मुबंई म्हाडा मुख्यधिकारी राधाकृष्णन बी. आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सामंत यांनी म्हाडाची राज्यस्तरीय बैठक रत्नागिरीत पार पडल्याचे सांगून या बैठकीला सर्व खात्याचे खातेप्रमुख उपस्थित असल्याचे सांगून बैठकीत काही शिफारसी केल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी येथे पार पडलेल्या बैठकीत सांगली , कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची तरतूद करून त्याबाबतचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वसाहतीचा प्रश्न निकाली लागल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की 155 कोटींची तरतूद पोलीस वसाहतीसाठी केली असून त्याची शिफारस केल्याचे त्यांनी सांगितले. हे 155 कोटी म्हाडाने शासनाने दिले आहे, ज्या पद्धतीने समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी म्हाडाने ज्या पद्धतीने शासनाला दिला होता, त्याच प्रकारे 155 कोटींचा निधी रत्नागिरी पोलीस वसाहतीसाठी म्हाडाने शासनाला दिला आहे.
तसेच रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथें 300 घरं, चिपळूण येथे 400 घरं व एक नाट्यगृह आणि रत्नागिरीत दोन नवीन प्रोजेक्ट लवकरच सुरू करणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 160 घरांची स्किम प्रस्तावित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, एक महिन्यापूर्वी मुंबईत म्हाडा प्राधिकरणाची एक बैठक झाली होती, त्यावेळी कलाकारांसह पत्रकार, म्हाडा कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांनी म्हाडाकडे घरांची मागणी केली होती, ती मागणी मान्य करत 300 घरं कलाकारांसाठी, 200 घरं पत्रकारासाठी, 200 घरं म्हाडा कर्मचारी तर शासकीय कर्मचार्यांसाठी 200 घरं विरार येथे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले..
पूरग्रस्तांसाठी म्हाडाने एक अनोखा निर्णय घेतला असल्याचे सांगून म्हाडा कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी दिले असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले..

Byte - उदय सामंत, म्हाडा अध्यक्ष
Body:रत्नागिरीत म्हाडाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

रत्नागिरी पोलीस वसाहतीसाठी 155 कोटींची तरतूद करून शिफारस

दापोली येथें 300 घरं, चिपळूण येथे 400 घरं बांधणार

कलाकार, पत्रकार, म्हाडा कर्मचारी, शासकीय कर्मचार्यांसाठी घरं उपलब्ध करून दिली जाणारConclusion:रत्नागिरीत म्हाडाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

रत्नागिरी पोलीस वसाहतीसाठी 155 कोटींची तरतूद करून शिफारस

दापोली येथें 300 घरं, चिपळूण येथे 400 घरं बांधणार

कलाकार, पत्रकार, म्हाडा कर्मचारी, शासकीय कर्मचार्यांसाठी घरं उपलब्ध करून दिली जाणार

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.