ETV Bharat / state

पावसामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता; आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत - आंबा उत्पादक शेतकरी

राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, हापूस आंब्याला पोषक असे वातावरण अद्यापही जिल्ह्यात निर्माण झालेले नाही. आंबा हंगाम दोन ते अडीच महिने लांबणार असून आंबा बागायतदारांना याचा मोठा फटका बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हापूस आंबा
author img

By

Published : Nov 13, 2019, 1:09 PM IST

रत्नागिरी - यावर्षी कोकणात उशिरा सुरू झालेल्या पावसाने नंतर मात्र, चांगलाच धुमाकूळ घातला. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरीही पावसाने हजेरी लावली. या लांबलेल्या पावसामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

पावसामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता

राज्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, हापूस आंब्याला पोषक असे वातावरण अद्यापही जिल्ह्यात निर्माण झालेले नाही. आंबा हंगाम दोन ते अडीच महिने लांबणार असून डिसेंबर महिन्यात झाडांना मोहोर येईल. फेब्रुवारी, मार्च महिन्यात आंबा बागायतदारांना याचा मोठा फटका बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

साधारणपणे कोकणात ऑक्टोबर महिन्यात पाऊस जातो. ऑक्टोबर हिटमुळे जमीन तापते. याचवेळी मतलई वारे वाहण्यास सुरुवात होते. जमिनीचा वाफसा, मतलई वारे आणि थोडी थंडी ही कलमांना मोहोर येण्यास अनुकूल परिस्थिती असते. मात्र, यावर्षी मोहोर येण्यास वातावरण अजूनही प्रतिकूल झालेले नाही.

हेही वाचा - त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त किल्ले रायगडावर दीपोत्सव, शेकडो दिव्यांनी उजळला रायगड किल्ला

उशिरा फ्लॉवरिंग झाले की हार्वेस्टींगलाही विलंब होतो. यावर्षी नोव्हेंबर सुरू झाला तरी थंडी नाही, त्यामुळे आलेली पालवी जूनी होऊन त्याला मोहोर येण्याची प्रक्रिया डिसेंबरमध्येच होईल. त्यानंतर पुढे आंबा तयार होण्यासाठी किमान 110 ते 120 दिवस लागतात. याप्रमाणे मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंबा तयार होईल. या परिस्थितीचा आंब्याच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होईल, अशी माहिती आंबा बागायतदार प्रसन्न पेठे यांनी दिली.

Intro:लांबलेल्या पावसामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता

आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत

रत्नागिरी, प्रतिनिधी

यावर्षी कोकणात पाऊस थोडा उशिरा सुरू झाला. मात्र त्यानंतर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. अगदी नोव्हेंबरचा पहिला सप्ताह उलटला तरी पाऊस जायचं काही नाही नाव घेत नव्हता.. मात्र या लांबलेल्या पावसामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.
सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र जिल्ह्यातील हापूसला पोषक असे वातावरण अद्यापही निर्माण झालेले नाही. त्यामुळे फेब्रुवारी, मार्च महिन्यात आंबा बागायतदारांना मोठा फटका बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हंगाम दोन ते अडीच महिने लांबेल असा अंदाज वर्तविला असून डिसेंबर महिन्यात मोहोर येईल असा अंदाज आहे.
कोकणात ऑक्टोबर महिन्यात पाऊस जातो. ऑक्टोबर हिटमुळे जमीन तापते आणि ताण मिळतो. यावेळी मतलई वारे सुटतात. वापसा, मतलई वारे आणि थोडी थंडी ही कलमांना मोहोर येण्यास अनुकूल परिस्थिती आहे. परंतु यंदा मोहोर येण्यास वातावरण अजूनही प्रतिकूल आहे. फ्लॉवरिंगला प्रतिकूल वातावरण नसल्यामुळे हंगाम लांबणार हे निश्‍चित झाले आहे. उशिरा फ्लॉवरिंग झाले की हार्वेस्टींगलाही विलंब होईल. नोव्हेंबर सुरू झाला तरी थंडी नाही. त्यामुळे आलेली पालवी जून होऊन त्याला मोहोर येण्याची प्रक्रिया डिसेंबरमध्येच होणार आहे. त्यानंतर पुढे आंबा तयार होण्यासाठी किमान 110 ते 120 दिवस लागतात. त्यासाठी यंदा मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंबा तयार होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे आंब्याच्या अर्थकारणावर मोठा परिणाम होईल अशी भिती आंबा बागायतदार प्रसन्न पेठे यांनी व्यक्त केली आहे. या सर्व परिस्थिती संदर्भात आंबा बागायतदार प्रसन्न पेठे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..Body:लांबलेल्या पावसामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता

आंबा उत्पादक शेतकरी चिंतेतConclusion:लांबलेल्या पावसामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता

आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.