ETV Bharat / state

हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत - हवामान बदलामुळे शेतकरी चिंतेत न्यूज

हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण त्यातच तीन दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

Mango farmers worried over climate change at ratnagiri
हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत
author img

By

Published : Dec 17, 2020, 11:50 PM IST

रत्नागिरी - सध्या होत असलेल्या हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण त्यातच तीन दिवसापूर्वी पडलेल्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

वातावरणातील बदलामुळे रोगांच्या प्रादुर्भवाचा धोका
यावर्षीच्या वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्याच्या मनावरचे चिंतेचे ढग आणखी गडद झाले आहेत. ढगाळ वातावरण असल्याने पालवी तसेच मोहोरावर तुडतुडा, बुरशी तसेच कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. त्यातच पावसामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या फवारणीचा खर्च ही वाया गेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

आंबा उत्पादक शेतकरी माहिती देताना...
शेतकरी हवालदिल
गेले अनेक वर्षे हवामानातील बदलाचा फटका आंबा पिकाला बसत आहे . खर्चा एवढे ही उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. असे असताना हंगामाच्या सुरुवातीला नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरण आहे.
अवकाळी पावसाने खर्च वाढवला
जिल्ह्याचे अर्थकारण आंबा आणि मच्छिमारी व्यवसायावर मोठ्या प्रमाणात असते. मात्र यावर्षी लांबलेल्या पावसामुळे 3 ते 4 टक्के आंबा कलमं सोडल्यास जवळपास सर्वच आंबा कलमांना पालवी आहे. मोहोराचे प्रमाणही अतिशय कमी आहे. त्यात थंडी गायब असून मध्येच पावसाने हजेरी लावली. त्यात ढगाळ हवामानामुळे पालवीवर तुडतुडा, थ्रीप्स, बुरशी, कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका वाढला आहे.

हवामानातील बदलामुळे कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. काही शेतकऱ्यांनी यापूर्वी केलेली फवारणी पावसामुळे वाया गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा फवारणी करावी लागणार आहे. या हंगामाच्या पुढील कालावधीत निसर्गाने साथ दिली तरच काही प्रमाणात आंबा उत्पादक शेतकरी तग धरू शकतो. नाहीतर वातावरण असंचं राहिल्यास त्याचा आणखी मोठा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो.

हेही वाचा - रत्नागिरीच्या तरुणाने बनवली ‘आयएनएस खुकरी’ची प्रतिकृती; संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण

हेही वाचा - 'शेतकरी कायद्याबाबतची शरद पवारांची भूमिका आश्चर्यकारक'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.