ETV Bharat / state

खैराच्या झाडांची तस्करी करणारा ट्रक पकडला; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

खैर या अतिसंरक्षित वृक्षाची तोड करण्यास परवानगी नसताना संरक्षित वनक्षेत्रातून त्याची चोरी करण्यात येते. त्याच्या सालाला बाजारात मोठी किंमत आहे.

खैराच्या झाडांची तस्करी करणारा ट्रक पकडला

author img

By

Published : Dec 26, 2020, 1:47 PM IST

रत्नागिरी- रायगड जिल्ह्यातून मंडणगड तालुक्यात खैराची अवैध वाहतूक करणारा ट्रक मंडणगड पोलिसांनी पकडला. पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.

खैराच्या झाडांची तस्करी करणारा ट्रक पकडला

'खैर' ला अतिसंरक्षित झाडाचा दर्जा-

खैर या अतिसंरक्षित वृक्षाची तोड करण्यास परवानगी नसताना संरक्षित वनक्षेत्रातून त्याची चोरी करण्यात येते. त्याच्या सालाला बाजारात मोठी किंमत आहे. महाड तालुक्यातील तळोशी ते मंडणगड तालुक्यातील दहागाव येथे ट्रकमधून अशाच खैराच्या झाडांची चोरटी वाहतूक केली जात होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला आहे.

या कारवाईत ५ लाख ४४ हजार ८०० रुपये किंमतीचे ९०८० किलो खैराचे लाकूड आणि ट्रक असे एकूण ७ लाख ४४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकणाचा अधिक तपास सुरु आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.