ETV Bharat / state

कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला; जिल्ह्यात पेटले पौर्णिमेचे होम - konkan shimgotav

कोकणात होळी उत्सवाला फार महत्व आहे. त्यामुळे कोकणात तेरसे शिमगे म्हणजे त्रयोदशीला होळी उभी राहते. तर दुसरा शिमगा पौर्णिमेचा, म्हणजे पौर्णिमेच्या रात्री होळी उभी करण्याचा अनोखा सोहळा रंगतो.

कोकणात शिमगोत्सव
कोकणात शिमगोत्सव
author img

By

Published : Mar 10, 2020, 11:39 AM IST

Updated : Mar 10, 2020, 1:49 PM IST

रत्नागिरी - राज्यात होळी उत्सवाची धूम पहायला मिळत आहे. तर इकडे कोकणात होळी उत्सवाचे दोन प्रकार पहायला मिळतात. त्रयोदशीच्या होळीनंतर सोमवारी रात्री पौर्णिमेचे होम लागले. तर पौर्णिमा संपल्यानंतर जे होम लागतात त्यांना भद्रेचे होम असे म्हटले जाते.

कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला

कोकणात होळी उत्सवाला फार महत्व आहे. त्यामुळे कोकणात तेरसे शिमगे म्हणजे त्रयोदशीला होळी उभी राहते. तर दुसरा शिमगा पौर्णिमेचा, म्हणजे पौर्णिमेच्या रात्री होळी उभी करण्याचा अनोखा सोहळा रंगतो. पौर्णिमा संपण्याच्या आत हा होम (होळी) पेटवावा लागतो. चिपळूण तालुक्यातील भिले गावातही पौर्णिमेचा होम पेटवला जातो. त्याअगोदर होम (होळी) भोवती श्री महादेव काळेश्वरी-भानोबाच्या पालखीसह प्रदक्षिणा मारल्या जातात. त्यानंतर होम (होळी) पेटवला जातो. त्यानंतर पालखी नाचवली जाते. मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित असतात.

हेही वाचा - शिमगोत्सवात सावर्डेमध्ये होल्टेहोमची परंपरा....

दरम्यान, जिल्ह्यातील विविध गावात सोमवारी रात्री पौर्णिमेचे होम पेटवण्यात आले. विशेष म्हणजे हे होम पेटवल्यानंतर फाका घालण्याची अनोखी परंपरा आजही जपण्यात आली आहे.

Last Updated : Mar 10, 2020, 1:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.