ETV Bharat / state

कात इंडस्ट्रीमधील चोरीप्रकरणी ऑफिसबॉयला अटक; सात लाखांचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : Jul 23, 2020, 12:29 PM IST

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सचिन कात इंडस्ट्रीमध्ये 16 जुलैला चोरट्यांनी ऑफिसच्या तिजोरीतून सहा लाख रुपयांची रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

robbery
कात इंडस्ट्रीमधील चोरीप्रकरणी ऑफिसबॉयला अटक; सात लाखांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सचिन कात इंडस्ट्रीमध्ये 16 जुलैला चोरट्यांनी ऑफिसच्या तिजोरीतून सहा लाख रुपयांची रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात तपास करून ऑफिसमध्ये काम करणारा ऑफिसबॉय अजय दिपक मोहिते याला अटक केली. त्याच्याकडून सहा लाखांच्या मुद्देमाल आणि अन्य ऐवजासह एकूण 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चोरीच्या घटनेनंतर सचिन गुरव यानी दिलेल्या तक्रारीवरून सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी तत्काळ एक पथक तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. हा गुन्हा अतिशय गुतांगतीचा व क्लीष्ट होता. पथकाने घरफोडीच्या अनुषंगाने सचिन कात इंडस्ट्रिज येथे कामाला असलेल्या सुमारे 150 कामगारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले होते. तपासादरम्यान या पथकास मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे कात इंडस्ट्रीजमध्ये ऑफीस बॉय म्हणून काम करणाऱ्या संशयीतास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.

ऑफिसबॉयने गुन्ह्याची कबुली दिली. अजय दीपक मोहिते असे या ऑफिसबॉयचे नाव आहे. त्याच्याकडून 6 लाखांची रोख रक्कम, सॅक, दुचाकी, आधारकार्ड व मोबाईल हॅन्डसेट असा एकूण सात लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक शिरीष सासने, चंद्रकांत लाड, संदिप कोळंबेकर, संजय कांबळे, शांताराम झोरे, नितीन डोमणे, विजय आंबेकर, सागर साळवी, दत्ता कांबळे, उत्तम सासवे यांनी पार पाडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.