ETV Bharat / state

चिपळूण पुराच्यावेळी कोळकेवाडी धरणातून पाणी सोडलं की नाही याची चौकशी होणं आवश्यक - सुनील तटकरे - रत्नागिरी अपडेट

चिपळूणला पुराचा फटका बसला तेव्हा कोळकेवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले की नाही याची चौकशी होणे आवश्यक आहे, आणि याबाबत आपण जलसंपदा मंत्री जयंतदादा पाटील यांच्याशी बोलणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी चिपळूणमध्ये बोलताना सांगितले. अधिकारी आणि पालकमंत्री यांच्यातील परस्परविरोधी विधानामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे हा संभ्रम दूर होण्यासाठी याबाबत समिती नेमून अहवाल लोकांसमोर येणे आवश्यक असल्याचे तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्त्वाची बातमी
महत्त्वाची बातमी
author img

By

Published : Jul 30, 2021, 5:48 PM IST

रत्नागिरी - चिपळूणला पुराचा फटका बसला तेव्हा कोळकेवाडी धरणातून पाणी सोडण्यात आले की नाही याची चौकशी होणे आवश्यक आहे, आणि याबाबत आपण जलसंपदा मंत्री जयंतदादा पाटील यांच्याशी बोलणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी चिपळूणमध्ये बोलताना सांगितले. अधिकारी आणि पालकमंत्री यांच्यातील परस्परविरोधी विधानामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे हा संभ्रम दूर होण्यासाठी याबाबत समिती नेमून अहवाल लोकांसमोर येणे आवश्यक असल्याचे तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. ते आज पूरग्रस्त चिपळूणची पाहणी करण्यासाठी आले होते, त्यावेळी पत्रकार परिषदेत बोलत होते.

'चिपळूण पुराच्यावेळी कोळकेवाडी धरणातून पाणी सोडलं की नाही याची चौकशी होणं आवश्यक'

कोळकेवाडी धरणातून पाणी सोडताना पूर्वकल्पना दिली नाही, नागरिकांच्या प्रतिक्रिया

चिपळूणला महापुराचा फटका बसला, मात्र कोळकेवाडी धरणातून पाणी सोडताना पूर्वकल्पना दिली नाही, त्यामुळे फटका बसला असे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. जिल्हाधिकारी, पालकमंत्री प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की पाऊस, धरणातून पाण्याचा विसर्ग, आणि समुद्राचे उधाण या सर्वांमुळे पुराचा मोठा फटका बसल्याचे म्हणाले होते. तर धरण सुरक्षा आणि पुनर्स्थापना समिती पुणे विभाग अध्यक्ष दिपक मोडक यांनी म्हटलं होतं की, कोळकेवाडी धरणातून गेल्या 30 वर्षांत दरवाजे उघडले नाहीत. चिपळूणात आलेला पूर पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे आलेल्या लोंढ्यामुळे पूर आला आहे. कोळेकेवाडी धरणातून पाणी सोडण्यात आलेले नाही, असे मोडक म्हणाले होते. यामुळे जनतेत संभ्रम आहे.

'लोकांच्या मनात शंका राहता कामा नये'

याबाबत बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, एवढा पाऊस झाला म्हटल्यावर कोळकेवाडी धरणातून विसर्ग होणे स्वाभाविक आहे. इतक्या पावसानंतर विसर्ग होणार नाही, असे मला स्वतःला वाटत नाही. दीपक मोडक एक चांगले अभियंते आहेत. माझ्यावेळी सुद्धा ते मुख्य अभियंते होते. त्यांनी हे विधान कशाच्या आधारे केले. कुठल्या माहितीच्या आधारे केले आहे ते तपासून घ्यावे लागेल. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाही आपण विनंती करणार आहोत, की लोकांच्या मनात शंका राहता कामा नये, कोळकेवाडी धरणातून विसर्ग झाला असेल तर तो किती झाला, विसर्ग होताना पूर्वसूचना का दिली गेली नाही, याची माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे याची चौकशी होणे आवश्यक आहे आणि याबाबत आपण जलसंपदा मंत्री जयंतदादा पाटील यांच्याशी बोलणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी चिपळूणमध्ये बोलताना सांगितले.

हेही वाचा - ऑनलाईन गेम’च्या माध्यमातून हजारो कोटी रुपये लुटले, भाजप आमदार राम कदम यांचा राज कुंद्रावर गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.