रत्नागिरी - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 800 च्या पुढे गेली आहे. जिल्ह्यात आणखी 25 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 806 वर गेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
गेले काही दिवस जिल्ह्यात सातत्याने 2 आकडी संख्येनेच रुग्ण वाढत आहेत. ही संख्या काही कमी होताना दिसत नाहीय. आज जिल्ह्यात 25 नव्या रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांचा आकडा हा 806वर पोहोचला आहे. नव्याने सापडलेल्या रुग्ण हे रत्नागिरीतील 8, लांजा 4, राजापूर 4, मंडणगड 4, दापोलीतील 5 आहेत. पण, यामध्ये समाधानाची बाब हीच आहे की, 500 पेक्षा देखील जास्त रूग्ण हे कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
हेही वाचा - नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधितांचे नातेवाईकचं करतात रुग्णाची शुश्रूषा
दरम्यान, सध्या जिल्ह्यातील विविध रूग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीदेखील चांगली असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळत आहे.