रत्नागिरी- कोकणातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. काल रात्री (१० ऑक्टोबर) पडलेल्या पावसामुळे कोकणातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे काढणी झालेले पीक भिजले आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेले काही दिवस ढगाळ वातावरण वगळता पाऊस पडत नव्हता. त्यामुळे, अनेक ठिकाणी भात पीक कापून ते शेतात ठेवण्यात आले होते. मात्र, काल रात्री पडलेल्या पावसामुळे कापलेले भात पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले. रत्नागिरीतील काजरघाटी गावातही अशीच स्थिती आहे. गाव परिसरातील शेतांमध्ये पाणी जमा झाल्याने भात शेतीला नुकसान झाले आहे. कापलेले भात पीक पाण्यात गेल्याने ते त्याला कोंब फुटण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ऊन पडली नाही तर भात पीक पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- काम सुरू असतानाही 28 कामांची निविदा कशासाठी? रत्नागिरीत भाजपााचा सवाल