ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यातील कोर्ले गावात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी - korle village latest news

लांजा तालुक्यातील कोर्ले गावात विविध कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जात आहेत. तसेच त्यांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. कोर्ले गावामध्ये अर्सेनिक अल्बम गोळ्या, सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. त्याबरोबरच बाजारपेठ क्षेत्रातील दुकानांना शासन निर्णयानुसार वेळेचे बंधन घातले आहे.

रत्नागिरी कोरोना अपडेट
रत्नागिरी कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 26, 2020, 10:43 AM IST

रत्नागिरी - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने गावांमधील ग्राम कृती दलांची जबाबदारी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर लांजा तालुक्यातील कोर्ले गावात विविध कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जात आहेत. तसेच त्यांची कडक अंमलबजावणी केली जात आहे. कोर्ले गावामध्ये अर्सेनिक अल्बम गोळ्या, सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. त्याबरोबरच बाजारपेठ क्षेत्रातील दुकानांना शासन निर्णयानुसार वेळेचे बंधन घातले आहे.

दुकानांसमोरील गर्दी कमी करण्यासाठी ठराविक अंतर राखण्यासाठीचे नियोजनही करून दिले आहे. तसेच मास्कचा वापर न करणाऱ्यांकडून दंड आकारला जात आहे. होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांवर देखरेख करण्यासाठी ग्रामकृती दल आणि आरोग्य विभागाकडून दरदिवशी भेट देण्यात येत आहे. कोरोनाच्या या बिकट काळात ग्रामस्थांनी स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी कशी घ्यावी, याविषयी वारंवार ग्रामपंचायतीकडून जनजागृती केली जात आहे.

या सर्व कामात गावच्या सरपंच स्नेहल संजय मोहिते, उपसरपंच संतोष तुकाराम जाधव, ग्रामसेवक तेजस वडवलकर, रुपेश झोरे आणि सर्व शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य परिश्रम घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.