रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सीआरझेडचं उल्लंघन करून बांधलेल्या बंगल्यावर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमैया (Kirit somaiya) का बोलत नाहीत, असा सवाल विचारणाऱ्या शिवसेना नेत्यांना भाजपा नेते किरीट सोमैया यांनी आज उत्तर दिलंय. नारायण राणेंनी सीआरझेडचं उल्लंघन करत बंगला बांधलाय मग तुम्ही कारवाई का करत नाही. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंसोबत सेटिंग केलं, असं म्हणायचं का, असा प्रतिसवाल भाजपा नेते किरीट सोमैया यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना विचारला आहे. आघाडी सरकरामधील नेते तुम्हाला दिसतात मग नारायण राणेंचा सीआरझेडमधील अनधिकृत बंगला दिसत नाही का, या अनिल परबांच्या प्रश्नाला किरीट सोमैया यांनी आज रत्नागिरीत झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलं.
...मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंसोबत सेटिंग केलं असं म्हणायचं का? किरीट सोमैया यांचा सवाल - Narayan Rane bungalow
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सीआरझेडचं उल्लंघन करून बंगला बांधला असेल तर त्यावर कारवाई करा, असं आव्हानच भाजपा नेते किरीट सोमैया यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे. तुम्ही कारवाई करत नाहीत. याचा अर्थ उद्धव ठाकरे आणि राणेंमध्ये सेटिंग झाली आहे का? असा सवाल किरीट सोमैया यांनी केला.