रत्नागिरी - कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसाचा फटका रत्नागिरी- कोल्हापूर मार्गाला बसला आहे.
मुसळधार पावसामुळे या मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
ही दरड हटवण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे वाहतूक पूर्ववत होण्याकरता आणखी काही कालावधी जाण्याची शक्यता आहे.
सध्या ही दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.