रत्नागिरी - जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. तर गुहागर तालुक्यातील १५ गावांना जोडणारा पालशेत पूल पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
पालशेत पूल पाण्याखाली -
जिल्ह्यात काही ठिकाणी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गुहागर तालुक्यातही पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्यातील १५ गावांना जोडणारा पालशेत पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे पालशेतच्या बाजारपेठेत देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. त्यामुळे इथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुहागरमध्ये आज (गुरुवार) पहाटेपासून पावसाने जोर धरला होता.
हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर पावसाची संततधार; सखल भागात साचले पाणी