ETV Bharat / state

रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपले, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

रत्नागिरी जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे नद्यांनी आपले रौद्ररुप धारण केले आहे. इथल्या बहुतांश नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी शिरले आहे.

नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
author img

By

Published : Jul 18, 2021, 4:27 PM IST

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे नद्यांनी आपले रौद्ररुप धारण केले आहे. इथल्या बहुतांश नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी शिरले आहे. नदीकाठी असणारी भातशेती देखील पाण्याखाली गेली आहे. पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे आणखी पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीतील काजळी नदीने देखील रौद्ररुप धारण केले आहे आणि आपले पात्र सोडले आहे. त्यामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे.

रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपले, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

सखल भाग जलमय
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध अशा पावसमध्ये देखील सखल भागात पाणी शिरले होते. इथल्या गौतमी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. परिणामी, समाधी मार्गावरील सखल भागात पाणी शिरले. मुसळधार पावसाने गौतमी नदी ओसंडून वाहत आहे.

टेंभेपूल भागातील समाजमंदिर भागापर्यंत शिरले पाणी
रत्नागिरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टेंभेपूल भागातही सखल भागात पाणी शिरले. पावसामुळे काजळी नदीला पूर आला आणि नदीचे पाणी आसपासच्या सखल भागात शिरले. यावेळी टेंभेपूल भागातील समाजमंदिर भागापर्यंत पाणी शिरले होते. सध्या पावसाने विश्रांती घेतली असून, नदीचा पूरही काहीसा ओसरला आहे. सखल भागात साचलेले पाणी देखील आता ओसरायला सुरूवात झाली आहे.

हेही वाचा - Exclusive Video: मुंबईतील चेंबूर येथे दरड कोसळल्याने मृत्यूचे तांडव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.