ETV Bharat / state

खेडच्या मनसे नगराध्यक्षांना जामीन मंजूर

खेडचे मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना आज उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. खेडमधील जगबुडी पुलाला महामार्ग अधिकाऱ्यांना बांधून ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आज रत्नागिरीच्या विशेष कारागृहातून त्यांची सुटका झाली आहे.

author img

By

Published : Aug 9, 2019, 1:06 PM IST

Updated : Aug 9, 2019, 1:28 PM IST

खेडच्या मनसे नगराध्यक्षांना जामीन मंजूर

रत्नागिरी - खेडचे मनसे नगराध्यक्षांनी महामार्ग अधिकाऱ्याला जगबुडी पुलाला बांधून ठेवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या तब्बल १ महिन्यानंतर आज त्यांना जामीन मिळाला आहे. उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील नवीन पुल खचल्याने मनसे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्यावेळी महामार्गाचे कार्यकारी अभियंता बामणे आणि उपअभियंता गायकवाड हे दोघे रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना पुलाबद्धल विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संतापून अधिकाऱ्याला पुलाला बांधून ठेवले होते. याप्रकरणी मनसे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व इतर मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, उच्च न्यायालयाने आज त्यांना जामीन मंजूर केले आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या विशेष कारागृहातून त्यांची सुटका झाली आहे.

माझ्यावर गुन्हा दाखल करणारे सरकारी गुंड - वैभव खेडेकर

न्यायालयात जामीन मिळाल्यानंतर वैभव खेडेकर यांनी बोलताना अप्रत्यक्षरित्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर आरोप लावला. ते म्हणाले, माझ्यावर गुन्हा दाखल करणारे हे सरकारी गुंड आहेत. मला जामीन मिळू नये, मी खडी फोडायला जावे, मनसेची वाटचाल थांबावी, यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले.

राजकारणात मी कुठेतरी अडचणीचा ठरत होतो. माझे नगराध्यक्षपद काहींना अडचणीचे वाटत होते. त्यामुळे मला ३ महिने आत ठेवून माझे नगराध्यक्षपद काढून घ्यायचे आणि आपला माणूस त्याठिकाणी बसवायचा अशा पद्धतीचे राजकारण झाले आहे. परंतु, जनतेचा आणि कुलस्वामिनीचा आशीर्वाद माझ्या पाठिशी असल्यामुळे मी बाहेर आलो, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 9, 2019, 1:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.