रत्नागिरी - कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सारा देश एकवटला असून अनेकांच्या मदतीचे हात पुढे येत आहेत. काही दिवसांआधी शिर्डी साई संस्थाननेही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले होते. तर, आता प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिर प्रशासनानेही ११ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील जगप्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे मंदिर प्रशासनाने तब्बल ११ लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे. गणपतीपुळे मंदिर प्रशासनानं एक बैठक घेत कोरोनासाठी सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याचा ठराव पास केला गेला. त्यानंतर हे पैसे जमा केल्यानंतर गणपतीपुळे मंदिर प्रशासनानाचे अध्यक्ष विवेक भिडे यांनी हि माहिती दिली.