ETV Bharat / state

स्मशानभूमीच्या कामात भ्रष्टाचार, रत्नागिरी नगर परिषद वादाच्या भोवऱ्यात

या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारासाठी १ लाख ३६ हजारांचे अंदाजपत्रक होते. मात्र, हे काम वाढून तब्बल ११ लाख ९२ हजारावर गेले. मात्र, १० लाख वाढीव देण्याचे अधिकार कोणाला? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

स्मशानभूमीच्या कामातील भ्रष्टाचार
author img

By

Published : Mar 6, 2019, 1:25 PM IST

Updated : Mar 6, 2019, 4:10 PM IST

रत्नागिरी - नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असणारी रत्नागिरी नगर परिषद आता पुन्हा एकदा स्मशानभूमीच्या कामातील भ्रष्टाचारामुळे चर्चेत आली आहे. स्मशानभूमिच्या बांधकामात ३५ लाखांहून रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनीच चौकशीचे आदेश दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

स्मशानभूमीच्या कामात भ्रष्टाचार

रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. स्मशानभूमीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांमुळे रत्नागिरी महापालिका चर्चेत आली आहे. मिरकरवाडा स्मशानभूमीच्या नुतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम ४७ लाखांचे असताना ठेकेदाराने ४९ लाखाचे काम पूर्ण केल्याचे पत्र दिले आहे. परंतु, प्रत्यक्षात १० लाखाचेही काम झाले नसल्याचा आरोप नगरसेवक समीर तिवरेकर यांनी थेट पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला.

या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारासाठी १ लाख ३६ हजारांचे अंदाजपत्रक होते. मात्र, हे काम वाढून तब्बल ११ लाख ९२ हजारावर गेले. मात्र, १० लाख वाढीव देण्याचे अधिकार कोणाला? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. स्मशानभूमीत स्टोअर रूमही झालेली नसल्याचा दावा नगरसेवक सुशांत चवंडे यांनी केला. केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठीच अंदाजपत्रकात बदल करून कामाचा समावेश करण्यात आल्याचा गंभीर आरोप नगरसेवक सुदेश मयेकर यांनी केला आहे. त्यामुळे प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरत ठेकेदार ‘निर्माण कंपनी’ने केलेल्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले.

विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये प्रभारी नगराध्यक्षांनाही चक्क तथ्य वाटत आहे. प्रत्यक्षात अनेक कामे झालेली नसतानाही नगर परिषदेकडून बिले दिली गेल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे ठेकेदार असलेली 'निर्माण कंपनी' आणि बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर नेमका कोणाचा आशीर्वाद होता? याची चर्चा सुरू आहे.

undefined

Intro:PKG स्टोरी

स्मशानभूमीच्या कामातील भ्रष्टाचारामुळे रत्नागिरी नगर परिषद वादात

रत्नागिरी, प्रतिनिधी

Anchor...

नेहमीच या ना त्या कारणानें चर्चेत असणारी रत्नागिरी नगर परिषद आता पुन्हा एकदा चर्चेत आली ती चक्क स्मशानभूमीच्या कामातील भ्रष्टाचारामुळे.. थोडाथोडका नव्हे तर 35 लाखाहून रकमेचा भ्रष्टाचार.. आणि विशेष म्हणजे प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनीच चौकशीचे आदेश दिल्याने भ्रष्टाचार नेमका कोणाच्या आशीर्वादाने झाला याचीच चर्चा शहरात रंगू लागली आहे..

Vo.. 1... शिवसेनेची एकहाती सत्ता असलेली रत्नागिरी नगर परिषद म्हणजे नेहमीच चर्चेत असणारी नगर परिषद.. कुत्र्यांची नसबंदी असो, किंवा ट्रक टर्मिनलचा विषय किंवा नगराध्यक्ष रजेवर पाठविण्याचा निर्णय असो, अशा अनेक कारणानी रत्नागिरी नगर परिषद नेहमीच चर्चेत राहिली आहे.. आणि आता पुन्हा एकदा ही नगर परिषद चर्चेत आली आहे ती स्मशानभूमीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांमुळे.. मिरकरवाडा स्मशानभूमीच्या नुतनीकरण आणि सुशोभिकरणाच्या काम 47 लाखाचे असताना ठेकेदाराने 49 लाखाचे काम पूर्ण केल्याचे पत्र दिले आहे. परंतु, प्रत्यक्षात 10 लाखाचेही काम झाले नसल्याचा आरोप नगरसेवक समीर तिवरेकर यांनी थेट पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला..

Byte -- समीर तिवरेकर, भाजप नगरसेवक

Vo. 2... या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारासाठी 1 लाख 36 हजारांचे अंदाजपत्रक होते. मात्र हे काम वाढून तब्बल 11 लाख 92 हजारावर गेलं.. मात्र 10 लाख वाढीव देण्याचे अधिकार कोणाला? असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. स्मशानभूमीत स्टोअर रूमही झालेली नसल्याचा दावा नगरसेवक सुशांत चवंडे यांनी केला. केवळ ठेकेदाराच्या फायद्यसाठीच अंदाजपत्रकात बदल करून कामाचा समावेश करण्यात आल्याचा गंभीर आरोप नगरसेवक सुदेश मयेकर यांनी केला आहे.. त्यामुळे प्रभारी नगराध्यक्ष बंडया साळवी यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरत ठेकेदार ‘निर्माण कंपनी’ने केलेल्या कामाच्या चौकशीचे आदेश दिलेत..

बंड्या साळवी, प्रभारी नगराध्यक्ष

Vo..3... विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये प्रभारी नगराध्यक्षांनाही चक्क तथ्य वाटतं.. प्रत्यक्षात अनेक कामं झालेली नसतानाही नगर परिषदेकडून बिलं दिली गेल्याचं त्यांनी मान्यच केलं आहे.. त्यामुळे ठेकेदार असलेली 'निर्माण कंपनी' आणि बिलं काढणाऱ्या अधिकाऱ्यांना नेमका आशीर्वाद तरी कोणाचा होता, हाच मोठा प्रश्न सर्वसामन्यांना पडला आहे...

Body:स्मशानभूमीच्या कामातील भ्रष्टाचारामुळे रत्नागिरी नगर परिषद वादातConclusion:स्मशानभूमीच्या कामातील भ्रष्टाचारामुळे रत्नागिरी नगर परिषद वादात
Last Updated : Mar 6, 2019, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.