ETV Bharat / state

रत्नागिरीत शिवसेनेच्या चार तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या तीन उमेदवारांचे अर्ज दाखल - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

शक्तिप्रदर्शन करताना शिवसेना उमेदवार
author img

By

Published : Oct 3, 2019, 6:57 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यातील शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी एकाच दिवशी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. जोरदार शक्तिप्रदर्शन करत दापोली, चिपळूण, गुहागर आणि राजापूरमधील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

रत्नागिरीत शिवसेनेच्या चार तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या तीन उमेदवारांचे एकाच दिवशी अर्ज दाखल

दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार संजय कदम यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. ते दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत.

हेही वाचा - रत्नागिरीत पाचही जागा शिवसेनेच्या वाट्याला; भाजप कार्यकर्त्यांचा बंडखोरीचा पवित्रा

गुहागर मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गुहागर हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे. मात्र, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या भास्कर जाधव यांच्यासाठी युतीकडून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला.

हेही वाचा - प्रदुषणमुक्तीचा संदेश देत कोल्हापुरात ऋतुराज पाटीलांनी सायकलवरून भरला उमेदवारी अर्ज

चिपळूण मतदारसंघातून शिवसेनेचे सदानंद चव्हाणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. चव्हाण हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी त्यांना हॅटट्रिक करण्याची संधी आहे.

हेही वाचा - 'साहेब माफ करा राम कदमला यावेळी मतदान नाही', शिवसैनिकांची घाटकोपरमध्ये बॅनरबाजी ?

राजापूरमधील शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्यावर शिवसेना नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. राजन साळवींनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून अविनाश लाड यांनी आपला उमेदवारी दाखल केली.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुदेश मयेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Intro:जिल्ह्यातील शिवसेनेच्या चार उमेदवारानी साधला आजचा मुहूर्त

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या तीन उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या चार उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मोठ्या शक्तिप्रदर्शनात दापोली, चिपळूण, गुहागर आणि राजापूरमधील उमेदवारांनी अर्ज दाखल केले.. तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या तीन उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला..

दापोली
दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज मोठं शक्तिप्रदर्शन करत योगेश कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचं संपूर्ण कुटुंब तसेच महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते..

तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार संजय कदम यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ते दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहेत.

गुहागर
सध्या चर्चेत असलेल्या गुहागर मतदारसंघात शिवसेनेकडून तिकीट मिळालेल्या भास्कर जाधव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुहागर हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ, मात्र राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या भास्कर जाधव यांच्यासाठी युतीकडून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आहे. त्यामुळे भाजपची इथं नाराजी आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी मात्र पाठ फिरवली..

चिपळूण
चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. चव्हाण हे तिसऱ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी हॅटट्रिक करण्याची संधी आहे.

राजापूर
राजापूरमधील शिवसेनेचे विद्यमान आमदार राजन साळवी यांच्यावर शिवसेना नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे.. राजन साळवी यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला..

तर कॉंग्रेसकडून अविनाश लाड यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.

रत्नागिरी
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुदेश मयेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

Byte - रामदास कदम, पर्यावरण मंत्री
योगेश कदम, दापोली - शिवसेना उमेदवारBody:जिल्ह्यातील शिवसेनेच्या चार उमेदवारानी साधला आजचा मुहूर्त

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या तीन उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी Conclusion:जिल्ह्यातील शिवसेनेच्या चार उमेदवारानी साधला आजचा मुहूर्त

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या तीन उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.