ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात चौपदरीकरणाचे काम रखडले; संगमेश्‍वर-लांजा पट्ट्यात १० टक्के कामही नाही - four lean

लोकप्रतिनिधींची अनास्था हे यातील प्रमुख कारण आहे. संगमेश्‍वर ते लांजापर्यंतच्या 90 किमीच्या पट्ट्यात दहा टक्केही काम झालेले नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात चौपदरीकरणाचे काम रखडले; संगमेश्‍वर-लांजा पट्ट्यात १० टक्के कामही नाही
author img

By

Published : May 6, 2019, 1:25 PM IST

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सिंधुदूर्ग जिल्ह्यात वेगात सुरु असताना, रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाचे काम मात्र रखडले आहे. 50 टक्के कामही जिल्ह्यात पूर्ण झालेले नाही. लोकप्रतिनिधींची अनास्था हे यातील प्रमुख कारण आहे. संगमेश्‍वर ते लांजापर्यंतच्या 90 किमीच्या पट्ट्यात दहा टक्केही काम झालेले नाही. त्यामुळे चौपदरीकरणासाठी आणखी किती कालावधी लागणार? हा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

काम अद्याप सुरूच...

काँग्रेसच्या कालावधीत सुरु झालेले मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्ष रखडले होते. मात्र भाजप शासनाच्या कालावधीत रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर दक्षिण कोकणात विशेषत: रत्नागिरी, सिंधुदूर्ग व रायगडमध्ये कामाला वेगाने सुरुवात झाली. सिंधुदूर्गमधील दोनपैकी एक लाईनचे काम मे अखेरीस पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाच्या कामाचा पूर्णत: बोर्‍या वाजला आहे.

कशेळी ते परशुराम टप्प्यातील काम कल्याणी टोलवेज कंपनी करत असून हे काम वेगात सुरु आहे. त्या खालोखाल परशुराम ते खेरशेत या 40 किमीच्या टप्प्यातही 30 ते 40 टक्के काम पूर्ण होत आले आहे. काही ठिकाणी एक मार्गिका तयार होऊन त्यावरुन वाहतूकही सुरु झाली आहे.

या महामार्गावरील आरवली ते तळेकांटे व तळेकांटे ते वाकेड लांजा हे दोन टप्पे एमइपी कंपनीकडे आहेत. या कंपनीकडून 10 टक्केही काम झालेले नाही. त्यामुळे केसीसी व डीबीएल कंपनीचे काम आहे. यातील केसीसी कंपनीने सुमारे 30 ते 40 टक्के काम पूर्ण करीत आणले आहे. सर्वाधिक चांगले काम डीबीएल कंपनीकडून सुरु आहे. या कंपनीने 50 टक्के काम पूर्ण केले आहे.

या कंपन्यांना पावसाळ्याच्या तयारीच्या दृष्टीने प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ठेकेदाराच्या चुकीमुळे अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ठेकेदाराचीच राहणार आहे. बोर्ड लावणे, सुरक्षेची उपाययोजना करणे, खड्डे भरणे ही कामे ठेकेदाराला करावी लागणार आहेत. पावसाळ्यापूर्वी धोकादायक पाँईंट काढून टाकण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

Intro:रत्नागिरी जिल्ह्यात चौपदरीकरणाचे काम रखडले
संगमेश्‍वर ते लांजापर्यंतच्या पट्ट्यात दहा टक्केही काम नाही

रत्नागिरी, प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सिंधुदूर्ग जिल्ह्यात वेगात सुरु असताना, रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाचे काम मात्र रखडले आहे. पन्‍नास टक्के कामही जिल्ह्यात पूर्ण झालेले नाही. लोकप्रतिनिधींची अनास्था हे यातील प्रमुख कारण आहे. संगमेश्‍वर ते लांजापर्यंतच्या 90 किमीच्या पट्ट्यात दहा टक्केही काम झालेले नाही. त्यामुळे चौपदरीकरणासाठी आणखी किती कालावधी लागणार हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
काँग्रेसच्या कालावधीत सुरु झालेले मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्ष रखडले होते. मात्र भाजप शासनाच्या कालावधीत रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर दक्षिण कोकणात विशेषत: रत्नागिरी, सिंधुदूर्ग व रायगडमध्ये कामाला वेगाने सुरुवात झाली. सिंधुदूर्गमधील दोनपैकी एक लाईनचे काम मे अखेरीस पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकरणाच्या कामाचा पूर्णत: बोर्‍या वाजला आहे. कशेळी ते परशुराम टप्प्यातील काम कल्याणी टोलवेज कंपनी करीत असून हे काम वेगात सुरु आहे. त्या खालोखाल परशुराम ते खेरशेत या 40 किमीच्या टप्प्यातही 30 ते 40 टक्के काम पूर्ण होत आले आहे. काही ठिकाणी एक मार्गिका तयार होऊन त्यावरुन वाहतूकही सुरु झाली आहे.
या महामार्गावरील आरवली ते तळेकांटे व तळेकांटे ते वाकेड लांजा हे दोन टप्पे एमइपी कंपनीकडे आहेत. या कंपनीकडून 10 टक्केही काम झालेले नाही. त्यामुळे केसीसी व डीबीएल कंपनीचे काम आहे. यातील केसीसी कंपनीने सुमारे 30 ते 40 टक्के काम पूर्ण करीत आणले आहे. सर्वाधिक चांगले काम डीबीएल कंपनीकडून सुरु आहे. या कंपनीने 50 टक्के काम पूर्ण केले आहे.
या कंपन्यांना पावसाळ्याच्या तयारीच्या दृष्टीने प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ठेकेदाराच्या चुकीमुळे अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ठेकेदाराचीच राहणार आहे. बोर्ड लावणे, सुरक्षेची उपाययोजना करणे, खड्डे भरणे ही कामे ठेकेदाराला करावी लागणार आहेत. पावसाळ्यापूर्वी धोकादायक पाँईंट काढून टाकण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.Body:रत्नागिरी जिल्ह्यात चौपदरीकरणाचे काम रखडले
संगमेश्‍वर ते लांजापर्यंतच्या पट्ट्यात दहा टक्केही काम नाही
Conclusion:रत्नागिरी जिल्ह्यात चौपदरीकरणाचे काम रखडले
संगमेश्‍वर ते लांजापर्यंतच्या पट्ट्यात दहा टक्केही काम नाही
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.