रत्नागिरी : माजी खासदार हुसेन दलवाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईत लिलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. मात्र, कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी ते अनेकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे.
कोरोना टेस्टनंतर पत्रकार परिषद, अनेकांना टेन्शन -
माजी खासदार हुसेन दलवाई यांना गेले दोन ते तीन दिवस त्रास जाणवत होता. म्हणून त्यांनी कोरोनाची तपासणी करून घेतली होती. स्वॅब दिल्यानंतर आपला कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी त्यांनी बुधवारी संध्याकाळी चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेतली होती.
दलवाईंच्या संपर्कातील कार्यकर्ते मोर्चात सहभागी -
बुधवारी दिवसभरात अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना भेटले होते. दरम्यान, पत्रकार परिषदेत हुसेन दलवाई यांच्यासोबत असलेले पदाधिकारी गुरुवारी झालेल्या महागाई निषेध मोर्चामध्येही सहभागी झाले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांसह अनेकजण टेन्शनमध्ये आहेत.
निष्काळजीपणा नडला -
एका जबाबदार नेत्याने दोन ते तीन दिवस ताप असताना आणि कोरोनाचा स्वब दिला असताना सुद्धा पत्रकार परिषद घेणे हे कितपत योग्य आहे? असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे. हा निष्काळजीपण आहे, अशा प्रतिक्रिया आता उमटत आहेत.
हेही वाचा - केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध उपोषणाला बसणार महसूल मंत्री थोरात
हेही वाचा - 'रँचो'नंतर 'व्हायरस'ने 'फरहानला'ही गाठले, आर माधवन 'थ्री इडियट्स'चा संदर्भ देत खुलासा