ETV Bharat / state

कोकण किनारपट्टीवर नौका विसावल्या, मासेमारी 2 महिने बंद - रत्नागिरी मासेमारी न्युज

पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिक नौकांना लागू राहणार नाही. बिगर यांत्रिक बोट मासेमारीला खाडीपात्र हवामान शांत असताना किनाऱ्यालगत मासेमारी करता येऊ शकते. मासेमारी बंदीचा कालावधी 1 जून ते 31 जुलै, असा एकूण 61 दिवसांचा असणार आहे. मात्र, बंदी आदेश मोडल्यास नौका, मासळी जप्त करण्यापासून कठोर कारवाई करण्याचा इशारा मत्स्य खात्याने दिला आहे.

fishing news konkan  ratnagiri latest news  ratnagiri fishing news  रत्नागिरी लेटेस्ट न्युज  रत्नागिरी मासेमारी न्युज  कोकणात मासेमारीवर बंदी
कोकण किनारपट्टीवर नौका विसावल्या, मासेमारी 2 महिने बंद
author img

By

Published : Jun 1, 2020, 3:32 PM IST

Updated : Jun 1, 2020, 4:36 PM IST

रत्नागिरी - येत्या काही दिवसांत मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल होईल. मात्र, सध्या मच्छिमारांची कोकण किनारपट्टीवर लगबग सुरू आहे. कारण आजपासून या हंगामातील कोकणातला मच्छिमारी हंगाम थंडावला आहे. 1 जून ते 31 जुलैपर्यंत यांत्रिक मासेमारी बंद असणार आहे. त्यामुळे आता कोकणातील किनाऱ्यावर बोटी विसावल्या आहेत.

कोकण किनारपट्टीवर नौका विसावल्या, मासेमारी 2 महिने बंद

महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमानुसार, 1 जून ते 31 जुलै 2019 या 61 दिवसांसाठी राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिकी मासेमारी नौकांना बंद घातली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब, वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवित व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येते.

दरम्यान, पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिक नौकांना लागू राहणार नाही. बिगर यांत्रिक बोट मासेमारीला खाडीपात्र हवामान शांत असताना किनाऱ्यालगत मासेमारी करता येऊ शकते. मासेमारी बंदीचा कालावधी 1 जून ते 31 जुलै, असा एकूण 61 दिवसांचा असणार आहे. मात्र, बंदी आदेश मोडल्यास नौका, मासळी जप्त करण्यापासून कठोर कारवाई करण्याचा इशारा मत्स्य खात्याने दिला आहे.

Last Updated : Jun 1, 2020, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.