ETV Bharat / state

दाभोळ बंदरात मासेमारी बोटीला आग, सर्व खलाशी सुखरूप - dabhol bandar

दाभोळ बंदराजवळ फडबंदर परिसारासमोर उभ्या असलेल्या मासेमारी बोटीला मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली.

boat fire
दाभोळ बंदरात मासेमारी बोटीला आग, जीवितहानी नाही
author img

By

Published : Apr 22, 2020, 10:01 AM IST

रत्नागिरी - जिल्ह्यातील दाभोळ खाडीच्या बंदरात उभ्या असलेल्या एका बोटीला मंगळवारी रात्री अचानक आग लागली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून बोटीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस बंद असलेल्या मासेमारीला सध्या परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, दाभोळ बंदराजवळ फडबंदर परिसरासमोर उभ्या असलेल्या मासेमारी बोटीला मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास अचानक आग लागली. यावेळी बोटीत काही खलाशी होते. या सर्वांनी पाण्यात उड्या मारल्या. दरम्यान, बंदरात बाजूला उभ्या असलेल्या बोटींनी आग विझवण्यासाठी धाव घेतल्याने अनर्थ टळला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.