रत्नागिरी - जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामधील गिमवी मुंढर माळरानावर मोठा वणवा लागला असून यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली आहे.
जिल्ह्यात सध्या वणव्याचं सत्र सुरूच आहे. गुहागर आणि राजापूर तालुक्यांमध्ये या महिनाभरात काही ठिकाणी वणवे लागल्याच्या घटना घडल्या होत्या. गेल्या आठवड्यात राजापूर शहरालगतच्या डोंगरावर मोठा वणवा लागला होता. त्यामध्येही आंबा, काजूची आणि इतर वनसंपदा जळून खाक झाली होती. त्यानंतर आज (गुरुवार) गुहागर तालुक्यातील गिमवीकडून मुंढर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडेच्या माळरानावर वणवा लागला.
हेही वाचा - रत्नागिरीमध्ये मुरुड समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला ५७ फुटांचा ब्लू व्हेल मासा
या वणव्यात अनेक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. हजारो हेक्टरवरील काजू आणि आंब्याच्या बागांसह अनेक झाडेही जळून खाक झाली. या वणव्याने लाखोंचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.
हेही वाचा - विहिरीत पडलेल्या गवा रेड्याची अखेर जेसीबीच्या साहाय्याने सुटका