रत्नागिरी - चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हजारो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत, त्यामुळे जे भारतीय चीनमध्ये राहत होते त्यांच्यात एक प्रकारे भीतीचे वातावरण पसरले होते. यामध्ये मुळ खेड शहरातील राहणारी सादिया मुजावर नावाची तरुणी होती. सादिया मुजावर मुळची खेड शहरातील राहणारी आहे. मात्र, ती चीनमध्ये नॅनटाँग युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. कोरोनोचा चीनमध्ये प्रसार झाल्यामुळे सादियासारख्या अनेक तरुण आणि तरुणी आता भारतात परतल्या आहेत. सादियाचा चीनमधील थरारक अनुभव आमच्या प्रतिनिधीने जाणून घेतला आहे.
हेही वाचा -
रामायणातील संकल्पनेवर यात्रेकरूंसाठी खास रेल्वे; मार्चअखेर होणार सुरू
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे या विध्यार्थ्यांना अनेक समस्याचा सामना करावा लागला होता. मास्क लावून आम्हा विद्यार्थ्यांना फिरावे लागत होते. तसेच दोन वेळा तापमान तपासले जात असल्याचे सादिया सांगत होती. आपली मुलगी चीनमध्ये अशा परिस्थितीत अडकून पडल्यामुळे सादियाचे पालक चिंतेत होते. सादियाच्या वडिलांनी तिला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेल्या वुहान या शहरापासून सादिया जवळपास 730 किलोमीटर लांब होती. पण या व्हायरसमुळे धाकधुक वाढलेली सादिया अखेर भारतात सुखरुप परतली आहे.
सादिया सांगत होती, "आम्ही नॅनटाँग या शहरात राहत होतो. तिथे 22 रुग्णांवर प्रादुर्भाव झाला होतो. तसेच नॅनटाँग विद्यापीठ प्रशासनाने चांगल्या प्रकारे खबरदारी घेतली होती. विद्यापीठ कॅम्पसच्या बाहेर न जाण्याचा आम्हाला विद्यापीठाने इशारा दिला होता. तिथे फळ व भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, प्रशासनाने आम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवल्या व घाबरुन न जाण्याचा विश्वास दाखवला होता."
हेही वाचा -