ETV Bharat / state

'अनिल परबांचे शेतजमीनीवर बेकायदेशीर रिसॉर्ट, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा' - अनिल परब 10 कोटी रूपयांचे रिसॉर्ट

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परब यांनी मुरुड येथे 10 कोटी रूपयांचे रिसॉर्ट बांधले आहे. मुळात ती शेतजमीन आहे. शेतजमीन असतानाही कोणत्याही परवानग्या यासाठी घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे परब यांनी शासनाची फसवणूक केली आहे. यात जिल्हाधिकारीही जबाबदार आहेत. त्यामुळे परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी', असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

ratnagiri
रत्नागिरी
author img

By

Published : May 24, 2021, 9:05 PM IST

रत्नागिरी - 'कोरोना काळात रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी दापोलीतील मुरुड येथे 10 कोटी रुपयांचे रिसॉर्ट उभारले. त्यामुळे त्यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी दाखल करायला पाहिजे. तसेच पदाचा दुरुपयोग करणार्‍या परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. या प्रकरणात जिल्हाधिकारीही जबाबदार आहेत. तलाठी व ग्रामसेवक यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा', अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

'शेतजमीनीवर 10 कोटींचे रिसॉर्ट, अनिल परब यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा'

'कोणत्याही परवानग्या घेतल्या नाहीत'

'दापोली येथील मुरुड समुद्रकिनारी सीआरझेडचे उल्‍लंघन करुन 10 कोटी रुपयांचे अनधिकृत रिसॉर्ट उभारण्यात आले आहे. या रिसॉर्टचे अनौपचारिक उद्घाटनही जानेवारी 2021 मध्ये करण्यात आले. कोरोना कालावधीत हे रिसॉर्ट बांधले गेले आहे. ही शेतजमीन असतानाही कोणत्याही परवानग्या यासाठी घेतल्या गेल्या नाहीत', असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

'शेतजमीन असतानाही बिनशेती कर कसा काय भरुन घेतला?'

किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्याकडे लेखी तक्रार केली. 'आपण या रिसॉर्टविषयी तक्रार दाखल केली. यानंतर पालकमंत्री अनिल परब यांनी ग्रामपंचायतीशी पत्र व्यवहार करुन शेतजमीनीवरील रिसॉर्टसाठी बिनशेती कर भरला. हा कर ग्रामसेवकांनी कसा काय भरुन घेतला? कागदोपत्री शेतजमीन असतानाही बिनशेती कर कसा काय भरुन घेतला जाऊ शकतो?' असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

'फौजदारी कारवाई करावी'

'या प्रकरणी ग्रामसेवक व तलाठी या दोघांनाही निलंबित करुन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी आपण जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. यावर योग्य ती चौकशी करण्याचे आश्‍वासन निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे. या सर्व प्रकरणाला रत्नागिरीचे जिल्हाधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. पालकमंत्री परब यांनी साठे या व्यक्‍तीकडून 1 कोटी रुपयांना 2017 मध्ये ही शेतजमीन विकत घेतली. त्याबाबत करारपत्र करण्यात आले होते. समुद्राजवळील या जमीनीवर कोट्यवधींचे रिसॉर्ट उभारण्यात आले. आपण तक्रार दाखल केल्यानंतर अनिल परब यांनी चार दिवसांतच जागेचा 4 वर्षांचा बिनशेती दस्त ग्रामपंचायतीमध्ये भरण्यास दिला होता. मात्र, ही जागा सदानंद कदम यांना विकताना त्यावर ती शेतजमीन असल्याचा उल्‍लेख आहे. त्यामुळे परब यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी दाखल करावी, अशी मागणी आपण केली आहे', असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

'सचिन वाझेकडील पैसे रिसॉर्टसाठी वापरले'

'अनिल परब व सचिन वाझेचे संबंध आहेत. त्याबाबत एनआयए व सीबीआयकडे आपण तक्रार केलेली आहे. वाझेने दिलेले पैसेच या रिसॉर्टसाठी वापरले गेले आहेत. त्यामुळे परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी. याबाबत आपण राज्यपालकांकडेही तक्रार केली आहे. त्यांनी एसआयटी चौकशी करावी अशी सूचना राज्य सरकारला केली आहे. ही जागा शेतजमीन असल्याचा व त्यावर मागील दीड वर्षात बांधकाम झाल्याचे गूगल मॅपचे पुरावे आपल्याकडे आहेत. याबाबत राज्य शासनाने कारवाई न केल्यास न्यायालयात जाणार आहे', असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

हेही वाचा - तिघांनी 1500 रुपये वाटून घेतले का? भाजप आमदाराचा ट्विटद्वारे राज्य सरकारवर निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.