रत्नागिरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. पाच पेक्षा अधिकजण जेथे एकत्र येतात अशी ठिकाणे बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा म्हणजेच किराणा सामान (Grocery), दूध, भाजीपाला, फळे व औषधालये (Chemist Shop) यांना हा आदेश लागू नाही. दरम्यान, या अत्यावश्यक सेवा वगळता बाकी बाजारपेठ बंद आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...
रत्नागिरीत अत्यावश्यक सेवा वगळता बाकी बाजारपेठा बंद
पाच पेक्षा अधिकजण जेथे एकत्र येतात अशी ठिकाणे बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी बाजारपेठ बंद आहेत.
रत्नागिरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. पाच पेक्षा अधिकजण जेथे एकत्र येतात अशी ठिकाणे बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा म्हणजेच किराणा सामान (Grocery), दूध, भाजीपाला, फळे व औषधालये (Chemist Shop) यांना हा आदेश लागू नाही. दरम्यान, या अत्यावश्यक सेवा वगळता बाकी बाजारपेठ बंद आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...
TAGGED:
कोरोना रत्नागिरी