रत्नागिरी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवार यांच्या हातातील कठपुतळी असल्याचा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे. राज्याचे मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे नेमके कुठे अडकले आहे, मंत्रीपद, शेतकऱ्यांना कर्जमाफी आदी विषयांबाबत माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी खास बातचीत केली. यावेळी निलेश राणे यांनी सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
हेही वाचा... चंद्रपुरात आश्रम शाळेच्या अधीक्षकाची शाळेच्या आवारात आत्महत्या
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले की, काही प्रमुख नेत्यांना जी खाती हवी आहेत ती मिळत नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांचे एकमेकांशी पटत नसल्याने, प्रत्येक जण मला काय मिळणार? हा विचार करत असल्याने, त्यावरच सगळे अडकले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे या सरकारमध्ये बिलकूल वजन नाही. त्यामुळेच पवार साहेबानी त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवार यांच्या हातातील कठपुतळी असल्याचा घणाघात यावेळी निलेश राणेंनी केला.
हेही वाचा... 'शिवभोजन' थाळीचं ठरलं; १० रुपयात मिळणार 'हे' पदार्थ
उद्धव ठाकरे यांचे आडनाव काढल्या नंतर उद्धव ठाकरे म्हणजे कोण, हे सर्व महाराष्ट्राला कळले पाहिजे. बाळासाहेबाचे नाव असल्यानेच उद्धव ठाकरेंना एक वलय मिळाले आहे. बाकी त्यांचे स्वतःचे कर्तृत्व काय आहे, अशा शब्दात निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शिवसेनेचे जे काही आमदार निवडून येतात ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून येतात. त्याचे श्रेय उद्धव ठाकरे यांना नाही, असेही राणे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... मागोवा २०१९ - सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या व्यापार क्षेत्रातील दहा घडामोडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात देखील नेमके कोणाला मंत्रिपद द्यायचे, या मुद्द्यावर निर्णय नाही. उद्धव ठाकरे यांना जो सर्वात जास्त पैसे देतो, त्यालाच ते मंत्रिपदी बसवतात. जो मोठ्या बॅगा देईल, त्याला मंत्रिपद हा उद्धव ठाकरे यांचा जुना स्वभाव असल्याचा खळबळजनक आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.
हेही वाचा... VIDEO: जाणून घ्या 2019 मधील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडी...