ETV Bharat / state

कोकणातील लाल मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, रत्नागिरीच्या सुशिल कोतवडेकरांचा उपक्रम - ganesh festival in Ratnagiri

कोकण आणि गणेशोत्सव यांचे एक वेगळे नाते आहे. या गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवाची लगबग वाढली आहे. गणेशोत्सव म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ती गणपतीची आकर्षक आणि सुबक मूर्ती. मात्र, काळ बदलला तसे सणांचे स्वरूपही बदलले.

लाल मातीपासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती
author img

By

Published : Aug 22, 2019, 1:58 PM IST

रत्नागिरी - स्पर्धेच्या युगात अनेकांना इको-फ्रेंडली गणेशमूर्तींचा विसर पडत चालला आहे. अनेक गणेशभक्त शाडूच्या मूर्तीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घरी आणतात. कारण त्या स्वस्त मिळतात. पण, या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. यावर रत्नागिरीच्या सुशिल कोतवडेकर यांनी पर्याय शोधला आहे.

गणेशमूर्तीकार असलेले सुशिल चक्क कोकणात उपलब्ध होणाऱ्या लाल मातीपासून गणपती मूर्ती तयार करतात. गेले 7 वर्षे ते लाल मातीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत आहेत. या मूर्तीना मागणीही चांगली आहे. एक फुटापासून ते 4 फुटांपर्यत विविध रुपातल्या साडेचार हजाराहून अधिक मूर्ती त्यांनी साकारल्या आहेत.

लाल मातीपासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती

रत्नागिरी जवळच्या सुफलवाडीतीस सुशील कोतवडेकर गेल्या 28 वर्षापासून गणेशमुर्ती घडवण्याचे काम करत आहेत. पण, गणपतीच्या मूर्ती करत असताना या मूर्ती पर्यावरण पुरक असाव्यात, असे सतत त्यांना वाटत असे. त्यामुळे त्यांनी कोकणात मिळणाऱ्या लाल मातीचा उपयोग करत गणेशमूर्ती घडवण्यास सुरूवात केली. कौल किंवा मातीची भांडी ज्या मातीपासून बनवतात ती कोकणातली लाल माती त्यांनी गणेशमूर्ती बनवण्यासाठी वापरली. कोकणात ही माती सहज कुठे हि मिळते. या मातीपासून एका फुटापासून ते 5 फुटापर्यंतच्या सुबक मूर्ती कोतवडेकर बनवतात. गेल्या 7 वर्षापासून कोतवडेकर लाल मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे काम करत आहेत. त्यात ते यशस्वीही झाले आहेत.

कोतवडेकर 500 रुपयांपासून ते अगदी 10 हजार रुपयापर्यंत मूर्तींची विक्री करतात. यावर्षी या लाल मातीपासून तब्बल साडेतीन हजारांहून अधिक मूर्ती त्यांनी बनवल्या आहेत. सध्या मूर्तीवर विविध आभूषण चढवण्याचे काम सुरु आहे. कोतवडेकर यांच्या या लाल मातीच्या गणपतीना संपूर्ण जिल्ह्यातून मागणी आहे.

कोतवडेकर यांच्या या लाल मातीच्या गणेशमूर्तीना जिल्ह्यासह मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात देखील मागणी आहे. शाडूच्या मातीपेक्षा या लाल मातीचे वजन अधिक आहे. पण, या लाल मातीचे गणपती पाण्यात लवकर विरघळतात. त्यामुळे लाल मातीच्या या गणेश मुर्तींचा उपयोग खऱ्या अर्थांन पर्यावरण संरक्षणासाठी होत आहे.

Intro:(विशेष रिपोर्ट) edited Pkg (शक्य झाल्यास vo ऍड करणे)

कोकणातल्याच लाल मातीपासून बनवल्या जातात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती

रत्नागिरी, प्रतिनिधी

कोकण आणि गणेशोत्सव यांचं एक वेगळं नातं आहे. या गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवाची लगबग वाढली आहे. मात्र गणेशोत्सव म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ती गणपतीची आकर्षक आणि सुबक मुर्ती. मात्र काळ बदलला तसं सणांंचं स्वरूपही बदलत चाललं आहे. स्पर्धेच्या या युगात अनेकांना इको फ्रेंडली गणेशमूर्तींंचा विसर पडत चालला आहे. अनेक गणेश भक्त शाडूच्या मूर्तीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घरी आणतात. कारण त्या स्वस्तही मिळतात. पण या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. यावर रत्नागिरीच्या सुशिल कोतवडेकर यांनी पर्याय शोधला आहे. गणेशमुर्तीकार असलेले सुशिल चक्क कोकणात उपलब्ध होणाऱ्या लाल मातीपासून गणपती मूर्ती तयार करतायत. गेले 7 वर्ष ते लाल मातीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशमुर्ती साकारत आहेत. या मूर्तीना मागणीही चांगली आहे. एक फुटापासून ते चार फुटांपर्यत विविध रुपातल्या साडेचार हजाराहून अधिक मुर्ती त्यांनी साकारल्यात. पाहूया लाल मातीतल्या सुबक गणेशमूर्तींंबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट

Vo..1.. रत्नागिरी जवळच्या सुफलवाडीतले सुशील कोतवडेकर गेली 28 वर्ष गणेशमुर्ती घडवण्याचं काम करत आहेत. पण गणपतीच्या मुर्ती काढत असताना या मुर्ती पर्यावरण पुरक असाव्यात अस सतत त्यांच्या मनाला वाटत होते. त्यामुऴेच कोकणात मिळणाऱ्या लाल मातीचा उपयोग करायचं त्यांनी ठरवलं. कोकणात कुठेही मिळणारी हि लाल माती घेवून त्यांनी गणपतीची मुर्ती घडवण्याची किमया सुरु केली. कौल किंवा मातीची भांडी ज्या मातीपासून बनवतात ती कोकणातली लाल माती त्यांनी गणेशमुर्ती बनवण्यासाठी वापरली. कोकणात हि माती सहज कुठे हि मिळते. या मातीपासूूून एका फुटापासून तेे पाच फुटापर्यतच्या सुबक मुर्ती कोतवडेकर बनवतात. गेली सात वर्षे कोतवडेेेकर या लाल मातीपासून गणेशमूर्ती बनवत आहेत आणि त्यात ते यशस्वी देखील झाले आहेत.

Byte -- सुशील कोतवडेकर, मूर्तिकार

व्हिओ-2- पाचशे रुपयांपासून ते अगदी दहा हजार रुपये किंमतीला या मुर्तीची ते विक्री करतात. यावर्षी या लाल मातीपासून तब्बल साडे तीन हजारांहून अधिक मुर्ती त्यांनी बनवल्या आहेत. सध्या मुर्तीवर विविध आभुषण चढवण्याचं काम सुरु आहे. कोतवडेकर यांच्या या लाल मातीच्या गणपतीना संपुर्ण जिल्ह्यातून मागणी आहे. पर्यावरणपुरक गणपती आपल्या घरी यावा म्हणुन अनेक गणेशभक्त कोतवडेकर यांच्या मूर्तीशाळेतून खास लाल मातीची गणेशमूर्ती घेऊन जातात..

बाईट-2- दिपक माणगावकर, गणेशमुर्ती घेणारे

बाईच-3- मिनल नागले. गणेशमुर्ती घेणारे गणेशभक्त

व्हिओ-3- end p2c
कोतवडेकर यांच्या या लाल मातीच्या गणेशमूर्तीना जिल्ह्यासह मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात देखिल मागणी आहे. शाडूच्या माती पेक्षा या लाल मातीचेवजन अधिक आहे. पण या लाल मातीचे गणपती पाण्यात लवकर विरघळतात. त्यामुळे लाल मातीच्या या गणेश मुर्तींचा उपयोग खऱ्या अर्थांन पर्यावरण संरक्षणासाठी होत आहे..

Body:(विशेष रिपोर्ट)

कोकणातल्याच लाल मातीपासून बनवल्या जातात पर्यावरण पूरक गणेश मूर्तीConclusion:(विशेष रिपोर्ट)

कोकणातल्याच लाल मातीपासून बनवल्या जातात पर्यावरण पूरक गणेश मूर्ती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.