ETV Bharat / state

माहेरवाशिण गौरीचे उत्साहात पूजन; कोकणात गौरीला दाखवला जातो तिखट मांसाहाराचा नैवेद्य - ratnagiri news

कोकणात मुखवट्यांच्या रूपात, उभ्या पाटावर ठेवून, फोटोच्या रूपात, तेरड्याच्या फुलासहित रोपाच्या रूपांत तर काही ठिकाणी खड्यांच्या रूपात गौरी पूजल्या जातात. दरम्यान गौरी पूजनाच्या दिवशी ‘गौरी ओवसा’ करण्याची पद्धत कोकणात आहे. त्यामुळे या सणाला माहेरवाशिणी माहेरी येत असतात. तसेच पूजनाच्या दिवशी माहेरवाशिणी गौरीला काही ठिकाणी तिखट मांसाहाराचा नेवैद्य दाखवला जातो.

Enthusiastic worship of Mahervashin Gauri in kokan
कोकणात गौरीला दाखवला जातो तिखट मांसाहाराचा नैवेद्य
author img

By

Published : Sep 13, 2021, 8:08 PM IST

रत्नागिरी - काल घरोघरी गौराईचं आगमन झाले आणि आज सर्वत्र गौरीचे पूजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. भाद्रपद शुद्ध पक्षात, ज्येष्ठ नक्षत्राच्या दिवशी गौरीपूजन करतात. आदल्या दिवशी संध्याकाळी गौरी घरी आणायच्या, दुसऱ्या दिवशी पूजा करायची व तिसऱ्या दिवशी गणपती विसर्जनासोबत त्यांचे विसर्जन करायचे अशी पद्धत कोकणात आहे.

कोकणात गौरीला दाखवला जातो तिखट मांसाहाराचा नैवेद्य

गौरी पूजनाच्या दिवशी ‘गौरी ओवसा’ -

कोकणात मुखवट्यांच्या रूपात, उभ्या पाटावर ठेवून, फोटोच्या रूपात, तेरड्याच्या फुलासहित रोपाच्या रूपांत तर काही ठिकाणी खड्यांच्या रूपात गौरी पूजल्या जातात. दरम्यान गौरी पूजनाच्या दिवशी ‘गौरी ओवसा’ करण्याची पद्धत कोकणात आहे. त्यामुळे या सणाला माहेरवाशिणी माहेरी येत असतात.

Enthusiastic worship of Mahervashin Gauri in kokan
कोकणात गौरीला दाखवला जातो तिखट मांसाहाराचा नैवेद्य

गौरीला तिखट मांसाहाराचा दाखवतात नैवेद्य -

कोकणातल्या गणेशोत्सवात गौरी पूजनाचा दिवस महत्वाचा असतो. कारण गौरी आगमनाच्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा किंवा गोड नैवेद्य दाखवला जातो. पण गौरी पूजनाच्या दिवशी कोकणातील मांसाहार करणाऱ्या अनेक घरात आज तिखटा सण साजरा होतो. गणेशोत्सवापूर्वी श्रावण महिन्यापासूनच अनेकजण मांसाहार सोडतात. मग हा मांसाहाराच उपवास गणेशोत्सवापर्यंत कायम राहतो. घराघरात गौरीचे आगमन झाले की पूजनाच्या दिवशी माहेरवाशिणी गौरीला काही ठिकाणी तिखट मांसाहाराचा नेवैद्य दाखवला जातो. माहेरवाशीण असलेल्या गौरीला तिखट मांसाहाराचा नैवेद्य दाखवल्यानंतर गणेशोत्सवासाठी गावात दाखल झालेले चाकरमानी आणि सारेच हा "तिखटा" सण जोरात साजरा करतात.

झिम्माफुगडीचा जागर -

गौरी पूजनाच्या रात्री गौरीसमोर झिम्माफुगडी सारखे महिलांचे खेळ रंगतात. कोकणातील गावागावातील घरात अगदी पहाटेपर्यंत गौरीसमोर हा जागर सुरु राहतो. भक्तिमय वातावरणात माहेरवाशिण गौरीचे पूजन केले जाते.

हेही वाचा - Gauri Festival : आज ज्येष्ठा गौरी पूजन; विदर्भात आंबील, फळांच्या नैवेद्याला महत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.