ETV Bharat / state

Emotional letter from MLA Uday Samant: उपरा, मी गद्दार नाही. आ. उदय सामंत यांचे भावनिक पत्र - शिवसेना निर्धार मेळावा

शिवसेनेच्या रविवारच्या रत्नागिरीतील निर्धार मेळाव्यानंतर (Shiv Sena Melawa) आमदार उदय सामंत (MLA Uday Samant) यांनी मतदारसंघातील मतदार आणि शिवसैनिकांना भावनिक आवाहन करणारे पत्र (Emotional letter from MLA Uday Samant ) प्रसिद्ध केलं आहे. रविवारी रत्नागिरी शहरात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदार उदय सामंत यांच्यावर अनेकांनी टीका केली. खासदार विनायक राऊत यांनी देखील उदय सामंत यांच्यावर जोरदार शाब्दिक टीकेचे बाण सोडले होते.

MLA Uday Samant
आ. उदय सामंत
author img

By

Published : Jul 12, 2022, 7:30 PM IST

रत्नागिरी : शिवसेनेच्या रविवारच्या रत्नागिरीतील निर्धार मेळाव्यानंतर (Shiv Sena Melawa) आमदार उदय सामंत (MLA Uday Samant) यांनी मतदारसंघातील मतदार आणि शिवसैनिकांना भावनिक आवाहन करणारे पत्र (Emotional letter from MLA Uday Samant ) प्रसिद्ध केलं आहे. रविवारी रत्नागिरी शहरात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदार उदय सामंत यांच्यावर अनेकांनी टीका केली. खासदार विनायक राऊत यांनी देखील उदय सामंत यांच्यावर जोरदार शाब्दिक टीकेचे बाण सोडले होते. दरम्यान खासदार विनायक राऊत साहेब मला 'उपरा', 'गद्दार' म्हटले याचं मला दुःख आहे, पण ते बोलले म्हणून मी बोलणार नाही असं उदय सामंत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

'नाव योग्य वेळी जाहीर करेन': गुवाहाटिला जाण्यापूर्वी मी सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करत होतो. ह्याचे साक्षीदार स्वतः खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई आहेत आणि ज्यांच्या मध्यस्थीने मी हे करत होतो, त्यांचं नावं मी योग्य वेळी जाहीर करेन. घटक पक्षाच्या अनैसर्गिक आघाडीसोबत राहण्यापेक्षा वंदनीय बाळासाहेब आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचाराने निर्माण झालेल्या युतीसोबत राहण्याचा मी निर्णय घेतला, तर माझं काय चुकलं असं सामंत यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे पत्रात ?

प्रिय,

शिवसेना मतदार बंधू - भगिनी आणि शिवसैनिक बंधू - भगिनी, सस्नेह जय महाराष्ट्र ...

पत्र प्रपंच एवढ्यासाठीच , काल आपल्या रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा मेळावा झाला. ह्या मेळाव्यात रत्नागिरीचे कमी आणि लांजा , राजापूर व संगमेश्वरचे जास्त शिवसैनिक होते. असो, मेळाव्याची सुरुवात विभाग प्रमुखांच्या भाषणांनी झाली. त्यांनी शिवसेनेप्रति निष्ठा व्यक्त केली. त्यानंतर नेते मंडळींची भाषणे सुरु झाली. मला अनेकांनी टोमणे मारले. सर्व भाषणे त्याच व्यासपीठावरून मी Live ऐकली. काहींनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रति निष्ठा व्यक्त केली. पण ती 'काही मंडळी कोण होती' ? ज्यांनी खा . विनायक राऊत यांच्या पहिल्या आणि दुसऱ्या निवडणुकीला मा. नारायण राणे ह्यांच्या आदेशाचे पालन केले ,काहींनी तर प्रचाराची पत्रके देखील गटारात फेकून दिली होती. त्यातील एकाने तर विनायक राऊत माझ्या अन्नावर जगतात ( डब्यावर ) नाहीतर त्यांना जेवण पण मिळू शकत नाही, असे जाहीर वर्तमान पत्रातून दिले होते. जाऊ दे मी त्याकडेही दुर्लक्ष करतो. कारण ह्याबाबतीत खा. राऊत साहेब निर्णय घ्यायला सक्षम आहेत. माझा कोणावरच राग नाही पण दुःख एकच आहे की खा. विनायक राऊत यांच्यासारखी एक अनुभवी व्यक्ती ज्या व्यक्तीला मी आपलं मानलं आणि आजही मानतो कारण राजकारणाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक स्नेह जपण्याचे संस्कार माझ्यावर माझ्या आई वडिलांनी केले आहेत. अशा व्यक्तीने मला गद्दार/ उपरा, अजून बरंच काही म्हणणं मला रुचले नाही . पण असो, मी मा.ना.श्री. एकनाथ शिंदे- मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या बरोबर सामील झालो. पण एक शिवसैनिक म्हणूनच. ज्या व्यक्तीने वंदनीय बाळासाहेबांना जेलमध्ये पाठवण्याचा विचार केला, ज्या व्यक्तीने बाळासाहेबांची टी बाळू म्हणून टिंगल केली, त्या व्यक्तीच्या विरोधातील हा उठाव होता. हा उठाव होता ज्यांनी शिवसेनेचे मुख्यमंत्री मा . उद्धव साहेब असताना महाराष्ट्रात आपल्या शिवसेनेला चौथ्या क्रमांकावर नेलं त्यांच्या विरोधात. हा उठाव होता ज्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मोक्का लावून जेलमध्ये टाकलं त्यांच्या विरोधात. हा उठाव होता ज्यांनी वि. दा. सावरकर नावाला कायम विरोध केला त्यांच्या विरोधात. हा उठाव होता जी लोक मा . उद्धव साहेब यांच्या स्वभावाचा फायदा घेऊन शिवसेना संपवू पाहणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात. आता अशा उठावात मी माझ्या राजकीय कारकिर्दीचा विचार न करता सामील झालो ह्याला 'गद्दारी ' म्हणायची की 'धाडस' हे आपणच ठरवा. माझे वडील श्री. अण्णा हे 1970 साली रत्नागिरी तालुक्यातील पाली ह्या गावी स्थायिक झाले. म्हणजे सुमारे ५२ वर्ष आम्ही पाली येथे राहतो. त्यांच्या अपार मेहनतीतून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. अनेकांना राजकारणात स्थिर होण्यासाठी त्यांनी आणि माझे मोठे बंधू श्री. किरण ऊर्फ भैय्या यांनी सढळ हस्ते मदत केली. ती पण परत न घेण्याच्या बोलीवरच. अनेक नेते , राजकारणी , शिवसेनेचे लोकप्रतिनिधी हे माझ्या घरी येतात. माझ्या आईच्या हातचं जेवण जेवतात. तिच्या जेवणाचे कौतुक करतात . वयाच्या ७५ व्या वर्षी देखील तिला सर्वांना जेवू घालण्याचा आनंद मिळतो. असे असूनसुद्धा मला काल 'उपरा' ही उपाधी लावण्यात आली. ठीक आहे, त्याकडेदेखील मी दुर्लक्ष करतो. पण मी माझ्या उभ्या आयुष्यात दुसऱ्याच्या वाईट परिस्थितीचा फायदा कधीही घेतला नाही. आजवरच्या आयुष्यात मी विकासकामांबाबत राजकारण केले नाही. म्हणूनच सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले. हेही माझ्या कुटुंबानेच दिलेले संस्कार आहेत. याच संस्कारातून मी प्रयत्न केला, तो कार्यकर्ते उभे करण्याचा. शासकीय योजनांसह वैयक्तिक पातळीवर मदत करून कार्यकर्ता कायमस्वरूपी उभा राहावा यासाठी मी प्रयत्न केले. हेच माझ्या एवढ्या वर्षातील राजकारणाचे संचित आहे. मी गुवाहाटिला जाईपर्यंत सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करत होतो, ह्याचे साक्षीदार स्वतः खा. राऊत साहेब, खा. अनिल देसाई हे आहेत आणि ज्यांच्या मध्यस्थीने मी करत होतो त्यांचं नाव मी योग्य वेळी जाहीर करेन. मा.ना.श्री. एकनाथ शिंदे -मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य ह्यांच्या बरोबर मा . उद्धव साहेबांचं जुळू नये यासाठी काम करणारी काही माणसं तिथं होती. हे खासदार विनायक राऊत यांना देखील माहीत आहे. तस त्यांनी मला बोलून देखील दाखवलं. मी त्यांना दोष देत नाही ते त्यांच्या ठिकाणी योग्यच आहेत. मन एकाच विचाराने सुन्न होत की कालपर्यंत माझ्या वडिलांना देव माणूस म्हणणारे, माझ्या आईला लक्ष्मीचा अवतार म्हणणारे, माझ्या मोठ्या भावाला सज्जन म्हणणारे, आमच्या सुख दुःखात समरस होणारे खा. विनायक राऊत साहेब 'उपरा' , 'गद्दार' आणि वैयक्तिक बरंच काही बोलले ह्याच मला दुःख आहे. पण ते बोलले म्हणून मी बोलणार नाही. त्यांनी मला राजकीय मदत नक्की केली आहे .ती मदत मी राजकीय कितीही मोठा झालो किंवा राजकारणात नसलो तरी विसरणार नाही. कालच्या मेळाव्यानंतर कुणाच्या मनात संभ्रम राहू नये, म्हणून पत्रातून संवाद साधत आहे. घटक पक्षासोबतची अनैसर्गिक आघाडी सोबत राहण्यापेक्षा वंदनीय बाळासाहेब आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचाराने निर्माण झालेल्या युतीसोबत राहण्याचा मी निर्णय घेतला तर आत्ता सांगा माझं काय चुकलं ?

लवकरच भेटू,

आपला उदय

टीप- आत्तापर्यंत घडलेल्या घडामोडींवर मी माझं मत व्यक्त केलं . ह्यापुढे कुणीही काहीही टीका केली तरी माझी प्रतिक्रिया हीच असणार. यापुढे विकासातूनच उत्तर देणार !

जय महाराष्ट्र !

हेही वाचाः Maharashtra Political Crisis : मनसे होणार का 41 आमदारांचा पक्ष ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.