ETV Bharat / state

ईव्हीएममध्ये हेराफेरी झाल्याचे आरोप खोटे; नारायण राणेंना जिल्हाधिकाऱ्यांचे प्रत्त्युत्तर - निलेश राणे

लोकसभेचा निकाल धक्कादायक आहे. तसेच या निकालात हेराफेरी झाल्याचा संशय खासदार नारायण राणे यांनी निलेश राणे यांचा पराभव झाल्यानंतर व्यक्त केला होता. त्यावरच आज जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

फाईल फोटो
author img

By

Published : May 25, 2019, 12:31 PM IST

रत्नागिरी - भारतीय निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन करत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये हेराफेरी केल्याचा आरोप खोटा असल्याचा खुलासा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी केला आहे. लोकसभेचा निकाल धक्कादायक आहे. तसेच या निकालात हेराफेरी झाल्याचा संशय खासदार नारायण राणे यांनी निलेश राणे यांचा पराभव झाल्यानंतर व्यक्त केला होता. त्यावरच आज जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

नारायण राणेंना प्रत्त्युत्तर देताना निवडणूक निर्यण अधिकारी सुनील चव्हाण

रत्नागिरीमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन बंगळूरू येथून आणलेल्या होत्या. त्याचा यापूर्णी कुठल्याही निवडणुकीत वापर झालेला नाही. या सर्व मशीनची तपासणी करण्यात आली. तसेच या निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर होणार होता. त्यामुळे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती, असे चव्हाण म्हणाले.

निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाल्यानंतर आयोगाच्या सॉफ्टवेअरच्या आधारे मशीनची २ वेळा सरमिसळ करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशीनचे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्या त्या मतदार संघातील यंत्रे जी. पी. एस. इनेबल वाहनाद्वारे पोलीस संरक्षणात पाठवण्यात आली. तसेच आयोगाच्या सुचनेनुसार तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुममध्ये सर्व मशीन ठेवण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कमीशनींग अर्थात उमेदवार सेटींगची प्रक्रिया होते. याबद्द्लची वेळ दिनांक आणि ठिकाण याची माहिती कळवण्यात आली होती. याप्रसंगी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच सर्वसमक्ष १ हजार मते देऊन ईव्हीएमची तपासणी करण्याची प्रक्रिया सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर झाली. त्यानंतर या पेट्या संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या. संपूर्ण स्ट्राँग रुम परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले होते. राजकीय पक्षाचे उमेदवार आणि प्रतिनिधी यांच्यासाठी या स्टाँग रुमची पाहणी करणे तसेच सी.सी.टी.व्ही.चे चित्रीकरण बघण्याची सोय केली होती. या स्ट्राँग रुमवर देखरेख करण्यासाठी राजपत्रीत अधिकाऱ्यांच्या दर तासाला एक अशी चोवीस तास ड्युटी लावण्यात आली होती. याव्यतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दैनंदिन स्वरुपात वेळोवेळी भेट देऊन याची तपासणी केलेली असल्याचे ते म्हणाले.

मतदानाच्या दिवशी आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन करून मतमोजणी यंत्रे केंद्रावर नेण्यात आली. त्यानंतर ती येथील मिरजोळे एमआयडीसीमधील फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामात ठेवण्यात आली. याठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभा निहाय ५ इव्हीएमचे कन्ट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यांची पडताळणी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी एकाही मताचा फरक दाखवला नव्हता. पूर्ण प्रक्रिया योग्यरित्या पार पडली आहे. त्यामुळे हेराफेरी झाल्याचे आरोप निराधार ठरत असल्याचे जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.

Intro:रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ
इव्हीएम बाबतचे आरोप निराधार

हेराफेरी झाल्याचा आरोप खोटा -

राणेंच्या आरोपांना प्रशासनाचं प्रत्युत्तर

रत्नागिरी, प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोग ओदशाच्या सर्व सूचनांचे पालन करुन ठरवून दिलेल्या पध्दतीने 46 रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे याबाबत व्यक्त करण्यात आलेला हेराफेरीचा आरोप खोटा आहे असा खुलासा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला आहे. याबाबतचे सर्व आरोप निराधार आहेत असेही ते म्हणाले. निलेश राणे यांचा पराभव झाल्यानंतर आमच्यासाठी हा निकाल धक्कादायक असून निकालात हेराफेरी झाल्याचा संशय खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला होता.
याबाबत जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणाले की रत्नागिरीमध्ये वापरण्यात आलेल्या EVM बेल, बंगलुरु यांच्यातर्फे प्राप्त झाल्या होत्या. त्याचा याआधी कोणत्याही निवडणुकीत वापर झालेला नाही. या सर्वांची प्रथम स्तरीय तपासणी जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने सर्व पक्षाच्या लोकांना देवून आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन करुन झाली. यंदाच्या निवडणुकीत VVPAT चा वापर होणार असल्याने डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती.
         निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाल्यानंतर दोन वेळा सरमिसळ आयोगाच्या सॉफ्टवेअरच्या आधारे करण्यात आली. यात प्रथम सरमिसळीत जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सरमिसळ झालेली EVM जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघ निहाय वाटण्यात आली. दुसरी सरमिसळ आयोगातर्फे नियुक्त निवडणूक निरिक्षक आणि उमेदवार यांच्या समोर झाली . पहिला सरमिसळीनंतर त्या त्या मतदार संघातील यंत्रे जी.पी.एस इनेबल वाहनाद्वारे पोलीस संरक्षणात पाठविण्यात आली. ती आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आली., असं चव्हाण यांनी म्हटलं आहे..         
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून EVM आणि VVPAT कमीशनींग अर्थात उमेदवार सेटींग ची प्रक्रिया होते याबाबतची वेळ दिनांक आणि ठिकाण याची माहिती कळविण्यात आली होती. याप्रसंगी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच सर्वासमक्ष ५ टक्के EVM वर १००० मते देवून तपासणी करण्याची प्रक्रिया सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर झाली. त्यानंतर या पेट्या संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रुमला ठेवण्यात आल्या.
         मतदानाच्या दिवशी आयोगाच्या सर्व सूचनांचे पालन करुन यंत्रे केंद्रावर नेण्यात आली. त्यानंतर ती येथील मिरजोळे एमआयडीसीमधील फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामात ठेवण्यात आली. याठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती ज्यात सीआरएसएफ, दुसऱ्या स्तरात राज्य पोलीस व तिसऱ्या स्तरावत स्थानिक पोलीस उपस्थित होते. संपूर्ण स्ट्राँग रुम परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले होते. या स्टाँग रुमची पाहणी करणे तसेच सी.सी.टि.व्ही चे चित्रीकरण बघणे याची उपलब्धता राजकीय पक्षाचे उमेदवार व प्रतिनिधी यांच्यासाठी करुन देण्यात आली होती. या स्ट्राँग रुमवर देखरेख करण्यासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या दर तासाला एक अशी चोवीस तास ड्युटी लावण्यात आली होती. याव्यतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दैनंदिन स्वरुपात वेळोवेळी भेट देवून याची तपासणी केलेली आहे.
आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभा निहाय ५ इव्हीएमचे कन्ट्रोल युनिट व VVPAT यांची पडताळणी उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आली. हा ताळमेळ एकाही मताचा फरक दाखविणारा नव्हता त्यामुळे पूर्ण प्रक्रिया योग्य झाल्याचे प्रमाणित झाले असल्यानेच सर्व आरोप निराधार ठरतात, असे सुनील चव्हाण यांनी म्हटलं आहे.
         या सर्व प्रक्रियेचे आयोगाच्या सूचनेनुसार छायाचित्रण तसेच व्हिडीओ चित्रीकरण वेळोवेळी करण्यात आलेले आहे. हे चित्रीकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे असेही ते म्हणाले.

Byte - सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉBody:रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ
इव्हीएम बाबतचे आरोप निराधार

हेराफेरी झाल्याचा आरोप खोटा -

राणेंच्या आरोपांना प्रशासनाचं प्रत्युत्तर
Conclusion:रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघ
इव्हीएम बाबतचे आरोप निराधार

हेराफेरी झाल्याचा आरोप खोटा -

राणेंच्या आरोपांना प्रशासनाचं प्रत्युत्तर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.