ETV Bharat / state

गीतेंनाच मत द्या ! तटकरेंच्या खेडमधील सभेत काँग्रेस नेत्याचा प्रताप - campaign

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब मुखातून एकदा जो शाब्दिक बाण गेला तो गेलाच. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावरून व्हायरल होत आहे.

सुनिल तटकरे, गौस खतीब, अनंत गीते
author img

By

Published : Apr 4, 2019, 10:51 AM IST

रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारांनी प्रचार सभांचा सपाटा लावला आहे. रोज जवळपास ४ ते ५ सभा, गाठीभेटी, बैठका आल्याच. नेते, उमेदवारांचा हा उत्साह पाहून कार्यकर्त्यांनाही हुरूप येतो. त्यामुळे सध्या सगळीकडे सभा, रॅली आणि प्रचाराचे वातावरण आहे. मात्र, या सभांच्या गोंधळात कोण काय बोलून जाईल ते काही सांगता येत नाही. असंच काहीसं गंमतीदार घडलं ते रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या खेडमधील एका जाहीर सभेत.

रत्नागिरी : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब सभेत बोलताना..

या सभेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी जवळपास साडेपाच मिनिटे भाषण केलं. मात्र भाषणाच्या शेवटी चुकून त्यांनी आघाडीच्या उमेदवाराला मत देण्याऐवजी, चक्क सेनेच्या उमेदवाराला मतदान करा असं सांगून टाकलं.. '२३ तारीख लक्षात ठेवा, २३ तारखेला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत गीते साहेबांनाच मतदान करायचं आहे' असे ते बोलून गेले.

मात्र त्यानंतर आपली चूक लक्षात येताच लगेच त्यांनी गीते साहेब नव्हे तटकरे साहेबांना मतदान करा असं सांगून टाकलं. मात्र त्यांच्या मुखातून एकदा जो शाब्दिक बाण गेला तो गेलाच. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावरून व्हायरल होत आहे.

Reporter Aap ला प्रॉब्लेम येत असल्याने video whatsaap करत आहे

अन... काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जाहीर सभेत म्हणाले 23 तारखेला गीते साहेबांनाच मतदान करा

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

रत्नागिरी, प्रतिनिधी

 लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. उमेदवारांनी प्रचार सभांचा झपाटा लावला आहे.. दरदिवस जवळपास 4 ते 5 सभा, त्याशिवाय गाठीभेटी, बैठका आल्याच.. नेते, उमेदवारांचा हा उत्साह पाहून कार्यकर्त्यांनाही हुरूप येतो.. त्यामुळे सध्या सगळीकडे सभा, सभा आणि सभा असं वातावरण आहे.. मात्र या सभांच्या रामरगाड्यात कोण काय बोलून जाईल ते काही सांगता येत नाही..  असंच काहीसं गंमतीदार घडलं रायगड लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या खेडमधील एका जाहिर सभेत... या सभेत काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी जवळपास साडेपाच मिनिटे भाषण केलं. मात्र भाषणाच्या शेवटी चुकून त्यांनी आघाडीच्या उमेदवाराला मत देण्याऐवजी, चक्क सेनेच्या उमेदवाराला मतदान करा असं सांगून टाकलं.. '23 तारीख लक्षात ठेवा, 23 तारखेला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत गीते साहेबांनाच मतदान करायचं आहे' असं ते बोलून गेले.. मात्र त्यानंतर आपली चूक लक्षात येताच लगेच त्यांनी गीते साहेब नव्हे तटकरे साहेबांना मतदान करा असं सांगून टाकलं.. मात्र त्यांच्या मुखातून एकदा जो शाब्दिक बाण गेला तो गेलाच.. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावरून व्हायरल होतोय.. त्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा आहे..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.