रत्नागिरी - शिवसेना नेते, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्या मालमत्तांवर आज ( 26 मे ) ईडीने छापेमारी केली ( ED Raid Anil Parab )आहे. दापोली तालुक्यातील वादग्रस्त साई रिसॉर्टवरही ही छापेमारी केली आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टमध्ये ईडीचे अधिकारी चौकशीसाठी सकाळी 6.30 वाजता दाखले झाले होते. त्यानंतर संध्याकाळपर्यत ही चौकशी सुरु ( ED Rai Sai Resort In Ratnagiri ) होती.
रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी सबंधित ७ ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून ईडीच्या मुंबई येथील कार्यालयातील ३ अधिकारी मुरुड येथील साई रिसॉर्ट येथे सकाळी ६.३० वाजता दाखल झाले आहेत.
किरीट सोमैयांची तक्रार - विभास साठे यांचेकडून अनिल परब यांनी दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्याला लागून असलेली ही खरेदी केली होती. काही दिवसांनी अनिल परब यांनी ही जागा त्यांचे निकटवर्तीय व माजी मंत्री रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना विकली होती. त्यावर सदानंद कदम यांनी अलिशान असे साई रिसॉर्ट बांधले होते. हे रिसॉर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचा भंग करण्यात आल्याची तक्रार भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमैयांनी केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाकडे केली होती. या तक्रारीनुसार पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मुरुडमध्ये येऊन पाहणी केली होती. त्यानंतर हे साई रिसॉर्ट तोडण्याचे आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिले होते. तसेच, दापोली न्यायालयात याबाबत एक खटलाही दाखल केला आहे.
आयकर विभागाने घेतली माहिती - हे रिसॉर्ट सदानंद कदम यांनी विकत घेतल असली तरी त्यात अनिल परब यांचे हितसंबंध असल्याचा आरोप किरीट सोमैयांनी वारंवार केला आहे. मध्यंतरी आयकर विभागाने केलेल्या चौकशीत साई रिसॉर्ट बांधण्यासाठी केलेल्या खर्चाबाबतही माहिती घेतली होती. त्यानंतर आज ( 26 मे ) अनिल परब यांचेशी संबंधित ठिकाणी ई़डीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे.
हेही वाचा - Chandrakant Patil Statement : चंद्रकांत पाटलांना 'ते' वक्तव्य भोवणार?; राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल