ETV Bharat / state

मद्यपी चढला मोबाईल टाॅवरवर...म्हणाला, हा तर दहीहंडीचा सराव

author img

By

Published : Jul 28, 2020, 5:49 PM IST

Updated : Jul 28, 2020, 6:26 PM IST

लांजा बसस्थानकाच्या आवारात असलेल्या एका टॉवरवर आज सकाळी एक तरुण चढत होता. हा टॉवर जवळपास 300 फूट उंच आहे. बसस्थानकाच्या आजूबाजूला असलेले रिक्षाचालक तसेच लोकांनी त्याला पाहिले. तसेच टॉवरवर न चढण्याचा सल्ला दिला.

drunk-man-climbs-on-mobile-tower-at-ratnagiri
मद्यपी चढाला मोबाईल टाॅवरवर...

रत्नागिरी- 'शोले'तल्या जयची आठवण करुन देणारा प्रकार आज लांजा बसस्थानकाजवळ घडला. दारू पिऊन तर्रर्र असलेला एक तरुण लांजा बसस्थानकाच्या आवारात असलेल्या मोबाईल टॉवरवर चढला. त्याचे लडखडणे पाहून बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. विजय पांडुरंग नेमण (वय ४५) असे या मद्यपी तरुणाचे नाव आहे.

मद्यपी चढाला मोबाईल टाॅवरवर...
लांजा बसस्थानकाच्या आवारात असलेल्या एका टॉवरवर आज सकाळी एक तरुण चढत होता. हा टॉवर जवळपास 300 फूट उंच आहे. बसस्थानकाच्या आजूबाजूला असलेले रिक्षाचालक तसेच लोकांनी त्याला पाहिले. तसेच टॉवरवर न चढण्याचा सल्ला दिला. मात्र, तो कुणाचेही न ऐकता वर चढत होता. खाली मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. प्रत्येकजण त्याला खाली उतर अशी विनंती करत होता. मात्र तो ऐकतच नव्हता, मी दहीहंडीचा सराव करत आहे, असे तो बोलत होता. तो जवळपास दीडशे फुट वर चढला, याचदरम्यान पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांना पाहिल्यानंतर तो खाली उतरला. खाली उतरल्यावर ताबडतोब पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

Last Updated : Jul 28, 2020, 6:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.