ETV Bharat / state

लॉकडाऊन ईफेक्ट : परिस्थितीने दाखवली नवी दिशा, डान्सर कलाकाराची ऑनलाईन मासेविक्री

author img

By

Published : May 13, 2020, 8:10 PM IST

रत्नागिरीतील एका डान्सर कलाकाराने लॉकडाऊनमुळे त्याची अकॅडमी बंद पडल्यामुळे ऑनलाईन मासेविक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. तसेच या कलाकाराला या व्यवसायामध्ये चांगले यश देखील मिळाले आहे.

Ratnagiri
ऑनलाईन मासेविक्री

रत्नागिरी - कोरोना पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनचा सध्या तिसरा टप्पा सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये कोरोनामुळे ओढावलेल्या परिस्थितीमुळे अनेक जण अडचणीत आले आहेत. अनेकांचे उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांचे रोजगारही धोक्यात आले आहेत. त्यामुळे नेमकं करायचं काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. पण, अशा परिस्थितीतही रत्नागिरीतील एका तरुणाने ऑनलाईन मासेविक्री करत रोजगाराची नवी संधी निर्माण केली आहे.

डान्सर कलाकाराची ऑनलाईन मासेविक्री

किरण बोरसुतकर असे या तरुणाचे नाव आहे. गेली 17 वर्ष ते डान्स अकॅडमी चालवत होते. किरण 2011 मध्ये 'मराठी पाऊल पडते पुढे' मध्ये चमकले होते. त्यानंतर स्टार प्रवाह वरील 'महाराष्ट्राचा डान्सिंग स्टार' या रिअ‌ॅलिटी शो मध्ये ते अंतिम फेरीत पोहचले होते. दूरदर्शनवरील कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते. अनेक अल्बमसाठी त्यांनी कोरियोग्राफी केली होती. त्यांच्या अकॅडमीतून अनेक कलाकार घडले आहेत.

सध्या डान्स अ‌कॅडमीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. दोन मुलं, पत्नी असं चौघांचे त्यांचं कुटुंब. मात्र, लॉकडाऊनमुळे डान्स अ‌ॅकडमी ठप्प झाली. येणारे उत्पन्न थांबले. हाताशी असलेला पैसाही संपला. त्यामुळे आता करायचं काय? कर्जाचे हप्ते कसे भरायचे, कुटुंबाचा गाढा कसा हाकायचा? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले. त्यावेळी आपल्याला या परिस्थितीत उभे राहिले पाहजे, यासाठी त्यांनी परिस्थितीसमोर हात न टेकता अनेक पर्यायांची चाचपणी सुरू केली. विचार करता-करता सध्या लोकांना कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता हे बघून किरण यांनी ऑनलाईन मासेविक्रीची व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी आपले सर्व मित्र, ओळखीचे लोक, नातेवाईक यांना तसा मेसेज पाठवला. त्यावेळी किरण यांच्या या कल्पनेला चांगला प्रतिसादही मिळाला.

अनेक ऑर्डरही येऊ लागल्या. व्हाट्सअपवर ऑर्डर घ्यायची त्यानंतर ऑर्डरनुसार जेटीवर जाऊन मासे आणायचे. त्यानंतर ही मासे ऑर्डरनुसार पॅक करायचे आणि ग्राहकाला घरपोच करायचे, असा दिनक्रम सध्या किरण यांचा आहे. सध्या दिवसाला जवळपास 20 ते 25 कोळंबी, पापलेटची जवळपास 15 ते 20 किलोची मागणी असते. तर सुरमई आणि बांगड्यालाही चांगली मागणी असल्याचं किरण बारसुतकर सांगतात.

दरम्यान, डान्सर म्हणून ओळख असलेल्या या नव्या व्यवसायात किरण यांना फायदा झाला आहे. पत्नी स्नेहल बारसुतकर यांचीही त्यांना या कामात चांगली मदत होते. तर घरपोच ताजे मासे मिळाल्याने ग्राहकही खूष असतात. तर लॉकडाऊनच्या काळात या तरुणाने हाताश न होता काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला म्हणून अनेक जण कौतुकाची थाप किरण यांच्या पाठीवर मारत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.