रत्नागिरी - कोविड-19 लसीकरणाचा आज शुभारंभ झाला. मात्र, लसीकरणाच्या शुभारंभाआधीच को-विन ॲप डाऊन झालेले पाहायला मिळाले. ॲप सुरू होण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे ऑफलाईन नोंदणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या, पण यामुळे कर्मचाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली.
ॲपला रात्रीपासून समस्या
देशभर आज कोविड-19 लसीकरणचा शुभारंभ झाला. मात्र, या लसीसाठी तयार करण्यात आलेल्या को-विन ॲपला रात्रीपासून समस्या येत होत्या. ॲप डाऊन झाल्याने लसीकरण केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांची संपर्कासाठी तारांबळ उडाली. त्यामुळे लस घेणाऱ्यांना मोबाईलद्वारे संपर्क केला जात होता. राज्यभरातील अनेक लसीकरण केंद्रावरती हीच परिस्थिती होती. ॲप डाऊन झाल्याने ऑफलाईन नोंदणी करण्याच्या आरोग्य विभागाकडून सूचना देण्यात आल्या होत्या.