ETV Bharat / state

रत्नागिरीच्या कोरेगावमध्ये युवा सेनेच्या माध्यमातून कोविड आयसोलेशन सेंटर सुरू

आपल्या गावातील कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णावर गावातच उपचार व्हावेत, या उद्देशाने खेड तालुक्यातील कोरेगाव येथे कोविड आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. युवा सेनेच्या माध्यमातून युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्या पुढाकारातून हे कोरोना आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे.

आयसोलेशन सेंटर
आयसोलेशन सेंटर
author img

By

Published : Jun 25, 2021, 1:24 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे आता गावागावातही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आपल्या गावातील कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णावर गावातच उपचार व्हावेत, या उद्देशाने खेड तालुक्यातील कोरेगाव येथे कोविड आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. युवा सेनेच्या माध्यमातून युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्या पुढाकारातून हे कोरोना आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. शिवसेना प्रवक्ते तथा आमदार भास्कर जाधव, आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत या कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे.

रत्नागिरीच्या कोरेगावमध्ये युवा सेनेच्या माध्यमातून कोविड आयसोलेशन सेंटर सुरू..

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ग्रामीण भाग सज्ज..

शिवसेना आणि कोकणचे नाते वेगळे आहे. त्यामुळे गावागावात कोविड आयसोलेशन सेंटर सुरू करण्यासाठी युवासेनेने पुढाकार घेतला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने कोरोगाव इथं युवा सेनेच्या माध्यमातून सुसज्ज असे कोविड आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. 20 बेडचे हे आयसोलेशन सेंटर असून इथल्या रुग्णांची जेवणासकट आरोग्याची काळजी इथे घेतली जाणार आहे. आमदार भास्कर जाधव आणि आमदार योगेश कदम या दोघांनीही युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांचे कोविड सेंटर सुरू केल्यामुळे कौतुक केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.