ETV Bharat / state

खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी - city President

नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे, संतोष पवार यांना १२ जुलै पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला होता. मात्र मंगळवारी अटकपूर्व जामिनावर झालेल्या सुनावणी नंतर वैभव खेडेकर व विश्वास मुधोळे या दोघांना अटक करून दापोली येथील पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी
author img

By

Published : Jul 10, 2019, 10:21 PM IST

रत्नागिरी - राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना दमदाटी करून नवीन जगबुडी पुलाच्या रेलिंगला बांधल्याचे प्रकरण घडले होते. या प्रकरणात खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व विश्वास मुधोळे यांच्यासह अन्य ७ जणांना आज खेड न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयाने वैभव खेडेकर व विश्वास मुधोळे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर अन्य ७ जणांना जामीन मंजूर करण्यात आला.

खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई-गोवा महामार्गावर भरणे येथे उभारण्यात आलेल्या नवीन जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला मोठमोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर शनिवारी 29 जूनला खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलकांची भेट घेण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्गच्या कार्यकारी अभियंता आर. के. बामणे व उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांना आंदोलनकर्त्यांनी दमदाटी करून नवीन जगबुडी पुलाच्या रेलिंगला बांधले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

महाडचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खेड पोलिसांनी नऊ आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी रहीम युसूफ सहिबोले, सागर प्रकाश कवळे, सुनील सीताराम चिले, राजेश बाळू कदम, शाम तुळशीराम मोरे, प्रमोद भार्गव दाभीळकर, राजेंद्र जगन्नाथ खेडेकर यांना अटक केली. या सात जणांना दोनवेळा पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे, संतोष पवार यांना १२ जुलै पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला होता. मात्र मंगळवारी अटकपूर्व जामिनावर झालेल्या सुनावणी नंतर वैभव खेडेकर व विश्वास मुधोळे या दोघांना अटक करून दापोली येथील पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तर संतोष पवार यांना जामीन मंजूर झाला होता. बुधवारी वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे याना पोलिसांनी खेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

Intro:खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी

रत्नागिरी, प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना दमदाटी करून नवीन जगबुडी पुलाच्या रेलिंगला बांधल्याप्रकरणी अटकेत असलेले खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व विश्वास मुधोळे यांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर व विश्वास मुधोळे यांच्यासह अन्य ७ जणांना आज खेड न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी या प्रकरणी न्यायालयाने वैभव खेडेकर व विश्वास मुधोळे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर अन्य ७ जणांना जामीन मंजूर करण्यात आला.
मुंबई-गोवा महामार्गावर भरणे येथे उभारण्यात आलेल्या नवीन जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला मोठमोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर शनिवारी 29 जून रोजी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते. दरम्यान आंदोलकांची भेट घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे व महाडचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांना आंदोलनकर्त्यांनी दमदाटी करून नवीन जगबुडी पुलाच्या रेलिंगला बांधले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. महाडचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खेड पोलिसांनी नऊ आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करून रहीम युसूफ सहिबोले, सागर प्रकाश कवळे, सुनील सीताराम चिले, राजेश बाळू कदम, शाम तुळशीराम मोरे, प्रमोद भार्गव दाभीळकर, राजेंद्र जगन्नाथ खेडेकर यांना अटक केली. या सात जणांना दोनवेळा पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे, संतोष पवार यांना १२ जुलै पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला होता. मात्र मंगळवारी अटकपूर्व जामिनावर झालेल्या सुनावणी नंतर वैभव खेडेकर व विश्वास मुधोळे या दोघांना अटक करून दापोली येथील पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तर संतोष पवार यांना जामीन मंजूर झाला होता.
आज बुधवारी वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे याना पोलिसांनी खेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. Body:खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडीConclusion:खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.