ETV Bharat / state

दापोलीत सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण, जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात आढळले 5 कोरोनाबाधित - dapoli corona patient

गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात एकूण 3 कोरोना रुग्ण सापडले आहेत. यापूर्वी जिल्ह्यात कोरोनाचे 6 रुग्ण सापडले होते. पैकी एकाचा मृत्यू तर पाच जण कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 11 वर पोहचली आहे. इतके दिवस सेफ झोन असलेल्या दापोली तालुक्यात सोमवारी पहिलाच पॉझिटिव्ह रुग्ण सापडला.

dapoli
दापोलीत सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण
author img

By

Published : May 5, 2020, 12:40 PM IST

रत्नागिरी - दापोली तालुक्यात कोरोनाचा सोमवारी पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 65 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ही महिला मुंबईतून उपचार घेऊन आली होती. सायन हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन ती गावी आली होती. मात्र, तिच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने सध्या या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

दापोलीत सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण

दरम्यान, गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात एकूण 3 कोरोना रुग्ण सापडले आहेत. यापूर्वी जिल्ह्यात कोरोनाचे 6 रुग्ण सापडले होते. पैकी एकाचा मृत्यू तर पाच जण कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 11 वर पोहचली आहे. इतके दिवस सेफ झोन असलेल्या दापोली तालुक्यात सोमवारी पहिलाच पॉझिटिव्ह रुग्ण सापडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील माटवण येथील ही महिला मुंबई येथे मुलाकडे रहात होती. तिचे पोटाचे ऑपरेशन सायन रुग्णालयात झाले होते. त्यानंतर या महिलेने मला बरे वाटत नाही, मला गावाला घेऊन चल असे मुलाला सांगितले, त्यामुळे ती महिला तिचा मुलगा व सून रुग्णवाहिका करून 30 एप्रिल रोजी माटवण येथे आले. तेथे सरपंच यांनी त्यांना दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले, ही महिला व तिच्या मुलाला दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयातील अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तिचा स्वॅबचा नमुना तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आला होता, सोमवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

dapoli
दापोलीत सापडला कोरोनाचा पहिला रुग्ण

या संदर्भात पुढील उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या महिलेच्या संपर्कात कोण कोण आले त्याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान, अधिक उपचारासाठी या महिलेला रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.