रत्नागिरी - ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी दिला आहे. ते मंगळवारी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. भानुदास माळी सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.
राज्यात सध्या आरक्षणावरून राजकारण तापलं आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच ओबीसी देखील आक्रमक झाले आहेत. त्यातच आजपासून मराठा समाजाचे आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोल्हापुरातून आंदोलन सुरु होत आहे.