ETV Bharat / state

Fraud Complaint Against Vaibhav Khedekar : मनसेचे वैभव खेडेकर यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल; विना परवानगी 'लकी ड्रॉ' प्रकरण

गणेशोत्सवादरम्यान खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे व राजवैभव प्रतिष्ठानतर्फे विना परवानगी 'लकी ड्रॉ' (Ganeshotsav lucky draw Ratnagiri) आयोजित करून लाखो रुपयांची बक्षिसे वाटल्या प्रकरणी (prize distribution of lakhs of rupees) मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार (MNS Vaibhav Khedekar Fraud Complaint) करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी अंती गुन्हा देखील दाखल केला आहे, अशी माहिती तक्रारदार अरबाज बडे यांनी दिली आहे.

Fraud Complaint Against Vaibhav Khedekar

author img

By

Published : Sep 27, 2022, 6:57 PM IST

रत्नागिरी : गणेशोत्सवादरम्यान खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे व राजवैभव प्रतिष्ठानतर्फे विना परवानगी 'लकी ड्रॉ' (Ganeshotsav lucky draw Ratnagiri) आयोजित करून लाखो रुपयांची बक्षिसे वाटल्या प्रकरणी (prize distribution of lakhs of rupees) मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार (MNS Vaibhav Khedekar Fraud Complaint) करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी अंती गुन्हा देखील दाखल केला आहे, अशी माहिती तक्रारदार अरबाज बडे यांनी दिली आहे.

मनसेचे वैभव खेडेकर यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल

लकी ड्रॉच्या नावाखाली मोटार सायकलचे वितरण केल्याची तक्रार - खेड येथील रहिवासी असलेले अरबाज असगरअली बडे (वय २५ वर्ष, रा. डाकबंगला खेड, ता . खेड जि . रत्नागिरी) हे मानवाधिकारी जर्नलिस्ट एसोसिएशनचा युवा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी बेकायदेशीरपणे पैसे जमा करून लकी ड्रॉ काढून नियमबाह्य प्रमाणे पैसे जमा करून धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता गणपती उत्सवामध्ये छत्रपती शिवाजी चौक ता. खेड येथे लाखो रुपये किमतीची मोटार सायकलचे वितरण केल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे लेखी केली होती. त्यांनी केलेल्या तक्रारी नमूद केल्यानुसार ता. ३१ ऑगस्ट २०२२ ते ता. ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत गणेशोत्सव सण साजरा होत असताना शहरातील शिवाजी चौक येथे मनसे पक्षातर्फे वैभव खेडेकर यांनी खेडचा राजा या गणपती मूर्तीची स्थापना केलेली होती.

किती रक्कम वसूल; चौकशी करा - या सणांचे अनुषंगाने वैभव खेडेकर यांनी लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे लकी ड्रॉचे तिकीट हे १०० रुपये किमतीला विकले होते. तिकीट विकण्याकरीता त्यांनी जिल्हाधिकारी अथवा धर्मादाय आयुक्तांची पूर्व परवानगी घेतलेली नसतानासुद्धा ती परवानगी आहे, असे भासवून त्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले. दहीहंडी उत्सव, गणेश उत्सव व नवरात्री उत्सव या सणाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजवैभव प्रतिष्ठान, खेडचे अध्यक्ष वैभव खेडेकर यांनी देणगी निधी जमा करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता खेड वाणीपेठ तसेच बाजारपेठेतील व्यापारांना बेकायदेशीर पावत्या देवून या पावत्यांवर कोणताही रजिस्ट्रेशन नंबर नसताना सुद्धा लोकांकडून बेकायदेशीर पैसे वसूल केले होते. या निधीमधून किती पैसे वसूल केले तसेच लोटे एमआयडीसीमध्ये कोणकोणत्या कंपनीमधून किती रक्कम वसूल केली याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे, असे बडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

ही तर देणगीदार नागरिकांची दिशाभूल - गणेशोत्सवांकरिता देणगी देणाऱ्या देणगीदार नागरिकांची दिशाभूल करून जमा झालेल्या देणगी रक्कमेतून लकी ड्रॉचे आयोजन करून राजवैभव प्रतिष्ठान खेड यांची प्रतिष्ठा वाढवण्याकरिता गैरमार्गाने देणगीदारांची फसवणूक केल्याचा आरोप करत राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव खेडकर व राजवैभव प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. सोमवार २६ सप्टेंबर रोजी खेडेकर यांच्या विरोधात फसवणूक व स्पर्धा कर आकारणी अधिनियम १९५८, महाराष्ट्र लॉटरी नियंत्रण व कर आकारणी आणि बक्षीस स्पर्धा अधिनियम १९५८ च्या कायद्यांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.