ETV Bharat / state

Rajapur Flood : नद्यांना आलेल्या पुरामुळे राजापूर शहराला पाण्याचा वेढा

राजापूर शहराला पुराचा वेढा पडला आहे. मुसळधार पावसामुळे अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे शहराभोवतीचा पुराचा वेढा ( Rajapur was flooded due to floods ) पडला.

Rajapur Flood
Rajapur Flood
author img

By

Published : Jul 10, 2022, 7:37 PM IST

रत्नागिरी - राजापूर शहराला पुराचा वेढा पडला आहे. मुसळधार पावसामुळे अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुरामुळे राजापूर शहरातील शिवाजीपथ रस्त्यासह वरचीपेठ, मुन्शी नाका परिसर पाण्याखाली गेला असून जवाहर चौकामध्ये सुमारे दिड-दोनफुट उंच पाणी वाढलेले होते. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने शहराभोवतीचा पुराचा वेढा सायंकाळी उशीरापर्यंत कायम राहीलेला होता. या पुरस्थितीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल रोडावली ( Rajapur was flooded due to floods ) आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राजापूर तालुक्यामध्ये संततधारा पाऊस पडत आहे. यामध्ये शहरातून वाहणार्‍या अर्जुना-कोदवली नद्यांना काल दुपारी पुर येवून पूराचे पाणी शहरामध्ये घुसले होते. पावसाचा जोर कमी झाल्याने रात्री उशीरा सुमारे सात तासाच्या कालावधीनंतर जवाहर चौकातील पुराचे पाणी ओसरले होते. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले होते. पण, पाऊस वाढल्याने पुराच्या पाण्याने जवाहर चौकामध्ये थेट धडक देत सायंकाळी उशीरापर्यंत त्या ठिकाणी ठिय्या मांडला होता. त्यानंतरही पावसाचा जोर कायम असल्याने पुराचे पाणी तासागणिक वाढत चालले होते.

नद्यांना आलेल्या पुरामुळे राजापूर शहराला पाण्याचा वेढा

सलग दुसर्‍या दिवशी आलेल्या पुराच्या पाण्याखाली शहरातील बहुतांश भाग गेला होता. त्यामध्ये जवाहरचौक, वरचीपेठ, मुन्शी नाका, बंदरधक्का परिसर, शिवाजी पथ रस्ता आदीचा समावेश आहे. जवाहर चौकातील टपर्‍यांसह शिवाजी पथ रस्त्यावरील टपर्‍यांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने दुपारपासून या टपर्‍या बंदावस्थेमध्ये होत्या. शहराप्रमाणे ग्रामीण भागही पुराच्या अधिपत्याखाली राहीला आहे.

हेही वाचा - Nitesh Rane : उद्धव ठाकरेंना धोका कोणी दिला?, नितेश राणे म्हणाले, 'एकनाथ शिंदे नाही, तर त्यांच्या...'

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.