चिपळूण (रत्नागिरी) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्व असलेल्या 'राजगृह' या निवासस्थानी झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा चिपळून वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी तसेच डॉ. बाबासाहेबांच्या कुटुंबियांना कायमस्वरुपी झेड सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजगृह निवासस्थान हे तमाम वंचित बहुजनांचे एक प्रेरणास्थान आहे. राजगृह हे आमची अस्मिता आहे. राजगृहाकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत करु नये, असा धमकी वजा इशारा भारिप, वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. चिपळूणमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर बहुजन वर्गातील कार्यकर्त्यानी घोषणा देत या घटनेचा निषेध केला.
दरम्यान, राजगृहाची मोडतोड करणाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत पोलीस शोधून काढतील आणि त्यांच्यावर कठोर कारवाई निश्चितपणे केली जाईल, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा जे काही सोर्सेस असतील त्यांच्याकडून माहिती मिळवून असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा सूचना आपण दिलेल्या असल्याची माहिती देसाई यांनी दिली.
हेही वाचा - राजगृह तोडफोड : आरोपींवर निश्चित कठोर कारवाई केली जाईल; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही
हेही वाचा - दापोली समुद्र किनाऱ्यावर डॉल्फीनला जीवनदान देण्यात तरुणांना यश